Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा पिस्तुले आणि काडतुसे बाळगणार्‍या दोघा सराईत आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी 2 पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे असा 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज उर्फ मन्या उर्फ शिवप्रसाद किसन चोरघे (वय 20), वैभव अनंत तरडे (वय 23, रा. दोघेही धायरेश्वर मंदिरामागे, धायरी) … The post Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त appeared first on पुढारी.

Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा पिस्तुले आणि काडतुसे बाळगणार्‍या दोघा सराईत आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी 2 पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे असा 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज उर्फ मन्या उर्फ शिवप्रसाद किसन चोरघे (वय 20), वैभव अनंत तरडे (वय 23, रा. दोघेही धायरेश्वर मंदिरामागे, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींचे नाव आहे. दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्या चोरघे आणि वैभव तरडे हे नांदेड सिटीच्या गेटच्या बाजूला उभे असून, त्यांच्याकडे गावठी पिस्तुले असल्याची माहिती सहायक पोलिस फौजदार आबा उत्तरेकर, अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलस निरीक्षक सचिन निकम यांनी सापळा रचून चोरघे आणि तरडे यांची झाडाझडती घेण्यासाठी गेले असता, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. चोरघे आणि तरडे यांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे 2 गावठी पिस्तुले आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलिस फौजदार आबा उत्तरेकर, अंमलदार संजय शिंदे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने केली.
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भारती विद्यापीठ पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतुसे असा 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजयकुमार तुळशीराम शिंदे (वय 31, रा. मुळशी) असे त्याचे नाव आहे. शिंदे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी निलेश जमदाडे,चेतन गोरे आणि महेश बारवकर यांना शिंदे दरी पुलाजवळ थांबला असून, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे, ही खबर मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता, गावठी पिस्तूल मिळून आले.
हेही वाचा
मुख्याध्यापक शेखर बागुल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
Crime News : फ्लेक्स फाडणे बेतले जीवावर; गणेश पेठेत तरुणाचा खून
Crime News : कनिष्ठ सहायकाला लाच घेताना पकडले
The post Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा पिस्तुले आणि काडतुसे बाळगणार्‍या दोघा सराईत आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी 2 पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे असा 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज उर्फ मन्या उर्फ शिवप्रसाद किसन चोरघे (वय 20), वैभव अनंत तरडे (वय 23, रा. दोघेही धायरेश्वर मंदिरामागे, धायरी) …

The post Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त appeared first on पुढारी.

Go to Source