शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाखापट्टणममध्ये आज (दि.२२) पहाटे भीषण अपघात झाला. शाळेतील मुलांची वाहतूक करणारी ऑटोची ट्रकला धडक धडकली. यात आठ शाळकरी मुले जखमी झाले आहेत. अपघातातील मुले ही बेथनी शाळेतील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होवू लागला आहे. (Visakhapatnam Accident)
Visakhapatnam Accident : ८ शाळकरी मुले जखमी
माहितीनुसार विशाखापट्टणममध्ये संगम सारथ थिएटरजवळ आज (दि.२२) पहाटे अपघात झाला. बेथनी शाळेतील मुलांना घेवून एक ऑटो चालली होती. दरम्यान ती ऑटो एका वेगवान जाणाऱ्या ट्रकला धडकली. यात ऑटोमधील बेथनी शाळेतील आठ मुले जखमी झाले आहेत. जखमी मुलांच्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असे अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. ट्रक चालक आणि क्लिनरने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु, स्थानिकांनी आणि ऑटो चालकांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले
#WATCH | Andhra Pradesh: Eight school children were injured in an accident when an auto collided with a lorry near Sangam Sarat Theatre in Visakhapatnam
Source: CCTV Footage from a local shop pic.twitter.com/sr9xaadUVo
— ANI (@ANI) November 22, 2023
हेही वाचा
Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024 | गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी, मिळाली ‘ही’ जबाबदारी
Israel-Hamas War News | गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल- हमासमध्ये करार
The post शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाखापट्टणममध्ये आज (दि.२२) पहाटे भीषण अपघात झाला. शाळेतील मुलांची वाहतूक करणारी ऑटोची ट्रकला धडक धडकली. यात आठ शाळकरी मुले जखमी झाले आहेत. अपघातातील मुले ही बेथनी शाळेतील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होवू लागला आहे. (Visakhapatnam Accident) Visakhapatnam Accident : ८ शाळकरी मुले जखमी माहितीनुसार विशाखापट्टणममध्ये संगम …
The post शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.