मुख्याध्यापक शेखर बागुल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक शेखर बागुल यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे 13 वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी येथील नगरपालिका नाट्यगृहात नुकताच पार पडला. यावेळी मुख्याध्यापक शेखर बागुल यांना राष्ट्रीय सैनिक फेडरेशन अध्यक्ष खा.सुधीर सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेंद्र कानडे, अभय नंदन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल शेखर बागुल यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, कार्याध्यक्ष रुपेश प्रधान यांनी कौतूक केले आहे.
The post मुख्याध्यापक शेखर बागुल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.
पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक शेखर बागुल यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे 13 वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी येथील नगरपालिका नाट्यगृहात नुकताच पार पडला. यावेळी मुख्याध्यापक …
The post मुख्याध्यापक शेखर बागुल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.