बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांशी तब्बल १० दिवसांनी व्हिडीओ संपर्क साधण्यात बचाव पथकाला मंगळवारी यश आले. त्यांनतर बचावकार्याला आणखी वेग आला आहे. आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचावकार्याबाबत आढावा घेतला. ( Uttarkashi Tunnel Rescue) पंतप्रधान मोदी यांनी फोनवर बोलून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना … The post बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांशी तब्बल १० दिवसांनी व्हिडीओ संपर्क साधण्यात बचाव पथकाला मंगळवारी यश आले. त्यांनतर बचावकार्याला आणखी वेग आला आहे. आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचावकार्याबाबत आढावा घेतला. ( Uttarkashi Tunnel Rescue)
पंतप्रधान मोदी यांनी फोनवर बोलून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली, असे मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट केले आहे. धामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज फोनवर बोलताना बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. केंद्रीय एजन्सी, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि राज्य प्रशासन यांच्यात परस्पर समन्वयाने केलेल्या बचाव कार्याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. यावेळी त्यांना गेल्या २४ तासात झालेल्या बचावकार्याची माहिती दिली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या चर्चेमुळे मनोबल वाढले आहे. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधानांकडून सतत मार्गदर्शन मिळत आहे. ज्यामुळे मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“Prime Minister Narendra Modi spoke on the phone today and took information about the ongoing rescue operations to provide food, medicines and other essential items to the workers trapped in the tunnel under construction in Silkyara, Uttarkashi and to get them out safely…”… pic.twitter.com/FBg5KclI03
— ANI (@ANI) November 22, 2023

रात्रभर खोदकाम सुरू
सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारी रात्रभर ड्रिलिंगचे काम सुरू होते. ऑगर मशीनद्वारे सहा ८०० मिमी पाईप टाकण्यात आले आहेत. ३६ मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यात आले आहे. सातव्या पाईपचे वेल्डिंगचे काम सुरू आहे. ड्रिलिंग सकारात्मक दिशेने जात आहे. आता बोगद्यात सुमारे २० ते २२ मीटर अंतर बाकी आहे. कामगार सुमारे ५६ मीटर आत आहेत. अशा परिस्थितीत बचाव कार्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Former advisor to the Prime Minister’s Office, Bhaskar Khulbe and Uttarkashi District Magistrate Abhishek Ruhela arrive at Silkyara Tunnel site where 41 workers are trapped after a part of the tunnel collapsed on November 12. pic.twitter.com/uaixs4VgYi
— ANI (@ANI) November 22, 2023

हेही वाचा : 

जाहिरातींसाठी पैसा आहे, पण प्रकल्पांसाठी नाही; सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले
‘एक देश-एक निवडणूक’पक्ष नव्हे, तर राष्ट्रहिताचे’
अयोध्येतील राम मंदिरातील पुजार्‍यांच्या 20 जागांसाठी आले 3 हजार अर्ज

 
The post बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांशी तब्बल १० दिवसांनी व्हिडीओ संपर्क साधण्यात बचाव पथकाला मंगळवारी यश आले. त्यांनतर बचावकार्याला आणखी वेग आला आहे. आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचावकार्याबाबत आढावा घेतला. ( Uttarkashi Tunnel Rescue) पंतप्रधान मोदी यांनी फोनवर बोलून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना …

The post बोगद्यातील खोदकामाला वेग, पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Go to Source