एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा

न्यूयॉर्क : एलियन खरच अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अनेक मतभेद आहेत. संशोधक देखील यावर संशोधन करत आहेत. अनेकांनी एलियन अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. तर, अनेकजण अद्याप एलियनच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे म्हणत आहेत. अशातच एलियन्सबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एलियन्सचे जग सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दोन ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व … The post एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा appeared first on पुढारी.
एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा


न्यूयॉर्क : एलियन खरच अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अनेक मतभेद आहेत. संशोधक देखील यावर संशोधन करत आहेत. अनेकांनी एलियन अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. तर, अनेकजण अद्याप एलियनच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे म्हणत आहेत. अशातच एलियन्सबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एलियन्सचे जग सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दोन ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व आहे. हे एलियन्स मानवाचा विनाश करू शकतात, असा दावा देखील संशोधकांनी केला आहे.
एका अंतराळ तज्ज्ञाने हा धक्कादायक दावा केला आहे. अंतराळात असलेल्या दोन बाह्यग्रहांवर एलियन्स असू शकतात अशी शक्यता या तज्ज्ञाने वर्तवली आहे. हे एलियन आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत. ते मानवापेक्षा कोट्यवधी वर्ष पुढे आहेत आहेत. अगदी सहज ते मानवाचा विनाश करू शकतात यामुळे मानवाने आधीच सतर्क झाले पाहिजे, असा इशारा देखील या तज्ज्ञाने दिला आहे. डेली स्टारने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. कार्डिफ युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जेन ब्रेव्हस यांनी एलियनबाबत हा खळबळजनक दावा केला आहे.
आपल्या आकाशगंगेत 70 ते 110 प्रकाश-वर्ष दरम्यान आणखी किमान दोन रहस्यमयी जग अस्तित्वात असू शकतात असा ब्रेव्हस यांचा दावा आहे. हे रहस्यमयी ग्रह दूरच्या तार्‍यांभोवती फिरत आहेत. या ग्रहावर एलियन असू शकतात. हे ग्रह पृथ्वीपेक्षा खूप जुने आहेत. यामुळे आपल्यापेक्षा कोट्यावधी वर्ष हे एलियन अस्तित्वात आहेत. हे ग्रह सूर्यापेक्षा खूप जुने आहेत म्हणजेच सुमारे 8 अब्ज वर्षे जुने आहेत असा दावा ब्रेव्हस यांनी केला आहे. कोणत्याही ग्रहाला कमी किरणोत्सारी होण्यास वेळ मिळाला आहे. या ग्रहावर एलियनचे अस्तित्व असू शकते. यामुळे या रहस्यमयी जगाचा शोध घेणे गरजेचे आहे.
एलियनच्या अस्तित्वाबाबत प्रोफेसर ब्रेव्हस यांनी मांडलेले तर्क तसेच त्यांच्या याबाबतच्या संशोधना संदर्भातील अहवाल अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्या ग्रहांवर एलियनचे अस्तित्व असल्याचा दावा ब्रेव्हस यांनी केला आहे त्या दोन ग्रहांना ‘एचडी 76932’ व ‘एचडी 201891’ अशी नावे देण्यात आली आहेत. या ग्रहावर अस्तित्वात असलेले एलियन आपल्यापेक्षा अधिक प्रगत असू शकतात असा दावा ब्रेव्हस यांनी या अहवालात केला आहे.
The post एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा appeared first on पुढारी.

न्यूयॉर्क : एलियन खरच अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अनेक मतभेद आहेत. संशोधक देखील यावर संशोधन करत आहेत. अनेकांनी एलियन अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. तर, अनेकजण अद्याप एलियनच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे म्हणत आहेत. अशातच एलियन्सबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एलियन्सचे जग सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दोन ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व …

The post एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा appeared first on पुढारी.

Go to Source