नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत केलेल्या अवाजवी दरवाढीच्या धक्क्यातून नाशिककर अद्याप सावरले नसताना पाणीपुरवठा व्यवस्थापनात चालू वर्षी ६६.५४ कोटींची तूट आल्याचा दावा करत विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. इतकेच नव्हे तर, मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्चही नाशिककरांकडून वसूल … The post नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा appeared first on पुढारी.

नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत केलेल्या अवाजवी दरवाढीच्या धक्क्यातून नाशिककर अद्याप सावरले नसताना पाणीपुरवठा व्यवस्थापनात चालू वर्षी ६६.५४ कोटींची तूट आल्याचा दावा करत विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. इतकेच नव्हे तर, मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्चही नाशिककरांकडून वसूल केला जाणार असून, नागरिकांकडून नव्याने मलजल उपभोक्ता शुल्क वसूल केले जाणार आहे. प्रतिहजार लिटरमागे तीन रुपये दराने हा नवीन कर आकारला जाणार असून, यात प्रतिवर्षी दर हजार लिटरमागे ५० पैशांची वाढ केली जाणार असल्याने नाशिककरांवर करवाढीचा मोठा बोजा पडणार आहे.
मुंढे यांनी घरपट्टीत केलेलेली अवाजवी दरवाढ नाशिककरांच्या मानगुटीवर कायम आहे. पाणीपट्टीतही दुपटीपर्यंत वाढ करण्याचा पंचवार्षिक प्रस्ताव मुंढे यांच्याच कार्यकाळात महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु या दरवाढीविरोधात नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाल्यानंतर तत्कालीन महापौरांच्या पत्रावरून प्रशासनाने सदर प्रस्ताव सभापटलावरून मागे घेतला होता. आता प्रशासकीय राजवटीची संधी साधत नाशिककरांवर पुन्हा एकदा पाणीपट्टी दरवाढ लादण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असताना नाशिककरांना कुणीही वाली उरले नसल्याचेच चित्र आहे. नाशिककरांना प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाशिककरांना पिण्यासाठी या धरणांतून दररोज ५४८ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. शुध्दीकरणाच्या प्रक्रियेअंती ४३८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. परंतु यापैकी केवळ २९७ दशलक्ष लिटर पाण्याचेच बिलिंग होते. पाणीपुरवठ्यावर वार्षिक १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे मिळणारा महसूल मात्र ६४ कोटी इतकाच आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापनातून महापालिकेला ६६.५४ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीच्या दरात तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. १ डिसेंबर २०२३ पासून दरवाढ प्रस्तावित आहे.
अशी आहे पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ…
पाणीपट्टीत पुढील चार वर्षांकरिता दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत घरगुती नळकनेक्शन धारकांसाठी दर हजार लिटर पाण्यासाठी पाच रुपये दर आकारले जातात. १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी पाणीपट्टीचे हेच दर ११ रुपये, २०२४-२५ करिता १२ रुपये, २०२५-२६ करिता १३ रुपये तर २०२६-२७ करिता दर हजार लिटरसाठी १४ रुपये दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. बिगर घरगुती पाणीवापरासाठी सद्यस्थितीत दर हजार लिटरसाठी २२ रुपये दर आकारले जातात. आता हेच दर २९ ते ३५ रुपये आकारले जातील. व्यावसायिक पाणीवापरासाठीचे २७ रुपये प्रतिहजार लिटर आकारले जाणारे दर नव्या प्रस्तावानुसार ३४ ते ४० रुपये आकारले जातील.
महसुलात दुपटीने वाढीचा दावा
२०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीतून महापालिकेला ७५ कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. गेल्या आठ महिन्यांत ५० टक्केदेखील पाणीपट्टी वसुली होऊ शकलेली नाही. पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ लागू झाल्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीतून महापालिकेला तब्बल १४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल. याद्वारे पाणीपट्टीच्या महसुलात दुपटीहून अधिक वाढ होईल. याद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थापनातील तूट दूर होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
असे आकारणार मलजल उपभोक्ता शुल्क
पाणीपट्टीत दुप्पट, तिप्पट दरवाढ प्रस्तावित करताना मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्च वसूल करण्यासाठी मलजल उपभोक्ता शुल्क लागू करण्याचा संयुक्त प्रस्तावही प्रशासनाने स्थायीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावानुसार मलनिस्सारण व्यवस्थेवर महापालिकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रतिहजार लिटर सांडपाण्यावर २.७७ रुपये खर्च येत आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी ‘मलजल उपभोक्ता शुल्क’ नावाने नवीन कर आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार २०२३-२४ या वर्षाकरिता ३ रुपये प्रतिहजार लिटर, २०२४-२५ करिता ३.५० रुपये, २०२५-२६ करिता ४ रुपये तर २०२६-२७ करिता ४.५० रुपये शुल्क वसूल केला जाणार आहे.
हेही वाचा :

Israel-Hamas War : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत
Israel-Hamas War News | गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल- हमासमध्ये करार
मिरज सिव्हिलमध्ये मिळणार अत्याधुनिक उपचार

The post नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत केलेल्या अवाजवी दरवाढीच्या धक्क्यातून नाशिककर अद्याप सावरले नसताना पाणीपुरवठा व्यवस्थापनात चालू वर्षी ६६.५४ कोटींची तूट आल्याचा दावा करत विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. इतकेच नव्हे तर, मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्चही नाशिककरांकडून वसूल …

The post नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा appeared first on पुढारी.

Go to Source