Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज (दि.३) पुन्हा एकदा विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Unseasonal Rain)
हवामान विभागाने दिलेल्या बुलेटिननुसार आज (दि.३) विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये नागपूरसह, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Unseasonal Rain)
विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातील इतर मराठवाडा, कोकण भागात कोणत्याही अवकाळी पावसाची शक्यता नाही, असे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा:
अवकाळीमुळे गहू, कांदा उत्पादक चिंतेत
Nashik Unseasonal Rain : नांदगाव तालुक्यात अवकाळीचा फटका, तहसीलदारांकडून पाहणी
Nashik | आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा, शेतकरी उद्ध्वस्त
Latest Marathi News राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा अवकाळीची शक्यता Brought to You By : Bharat Live News Media.