Bharat Live News Media ऑनलाईन : निफ्टी ५० निर्देशांकांची विक्रमी घौडदौड सुरुच आहे. निफ्टीने आज सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात २२,४४० अंकाला स्पर्श करत नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर तो २२,४०० वर आला. निफ्टीवरील तेजीत फायनान्सियल, ऑटो आणि एनर्जी स्टॉक्स आघाडीवर आहेत. तर सेन्सेक्स सुमारे १२५ अंकाच्या वाढीसह ७३,९३० वर आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी जूनमध्ये व्याजर कपातीची आशा व्यक्त केली आहे. यामुळे आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे.
निफ्टीवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, बीपीसीएल, ओएनजीसी हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले आहेत. तर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, आयशर मोटर्स, एम अँड एम, एसबीआय लाईफ हे घसरले आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसही तेजीत आहे.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स तेजीत आहेत. तर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन हे शेअर्स घसरले आहेत.
जपानच्या बेंचमार्क निक्केईने प्रथमच ओलांडला ४० हजारांचा टप्पा
अमेरिकेच्या बाजारातील वाढीनंतर सोमवारी जपानच्या बेंचमार्क निक्केई निर्देशांकाने (Japan’s benchmark Nikkei index) प्रथमच ४० हजारांचा टप्पा ओलांडला. Nikkei ने आणखी एक नवीन उच्चांक गाठल्याने सोमवारी आशियाई शेअर बाजार मजबूत दिसून आले. निक्केई ओपनिंग बेलनंतर ४०,२४५ वर पोहोचला. तर व्यापक टॉपिक्स निर्देशांकही वधारला आहे.
Latest Marathi News बाजारात रोजच ‘रेकॉर्डब्रेक’ तेजी! निफ्टीवर ‘हे’ स्टॉक्स आघाडीवर Brought to You By : Bharat Live News Media.
बाजारात रोजच ‘रेकॉर्डब्रेक’ तेजी! निफ्टीवर ‘हे’ स्टॉक्स आघाडीवर