जगभरात एक अब्जहून अधिक लठ्ठ माणसं!

लंडन : बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूड यामुळे कंबरेची टायर कधी झाली हे अनेकांना कळत नाही. ज्यावेळी कळते त्यावेळी मग वजन घटवण्यासाठी आटापिटा सुरू होतो. जगात लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. Obesity लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आयतेच आवतण मिळत असते. आता ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालात प्रकाशित झालेल्या जागतिक अंदाजानुसार, जगभरात … The post जगभरात एक अब्जहून अधिक लठ्ठ माणसं! appeared first on पुढारी.

जगभरात एक अब्जहून अधिक लठ्ठ माणसं!

लंडन : बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूड यामुळे कंबरेची टायर कधी झाली हे अनेकांना कळत नाही. ज्यावेळी कळते त्यावेळी मग वजन घटवण्यासाठी आटापिटा सुरू होतो. जगात लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. Obesity लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आयतेच आवतण मिळत असते. आता ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालात प्रकाशित झालेल्या जागतिक अंदाजानुसार, जगभरात एक अब्जहून अधिक लोक लठ्ठ आहेत.
2022 च्या आकडेवारीनुसार यामध्ये सुमारे 88 कोटी प्रौढ आणि 15.9 कोटी मुलांचा समावेश आहे. पॉलिनेशिया भागातील ‘टोंगा’ या छोट्या द्वीपसमूहावरील महिला आणि याच भागातील सामोआ देशातील पुरुष लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. इथले जवळपास 70-80 टक्के प्रौढ लोक लठ्ठ Obesity आहेत. सुमारे 190 देशांच्या या यादीत ब्रिटन पुरुषांसाठी 55 व्या आणि महिलांसाठी 87 व्या स्थानावर आहे. शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने म्हटल्याप्रमाणे, लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी त्यात मोठ्या बदलांची नितांत गरज आहे.
लठ्ठपणामुळे Obesity हृदयरोग, टाईप 2 मधुमेह आणि कर्करोगांसह अनेक गंभीर आजार विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. जागतिक लठ्ठपणाचा दर (वयातील फरक लक्षात घेतल्यानंतर लठ्ठ म्हणून वर्गीकृत केलेल्या लोकसंख्येची टक्केवारी) पाहताना संशोधकांना आढळले की, अमेरिकन पुरुष या यादीत 10 व्या आणि महिला या यादीत वरून 36 व्या स्थानावर आहेत. तर भारतीय महिला 190 देशांच्या यादीत 171 व्या आणि पुरुष 169 व्या स्थानावर आहेत.
चिनी महिला 179 व्या आणि पुरुष 138 व्या स्थानावर आहेत. इम्पीरियल Obesity कॉलेज लंडनचे वरिष्ठ संशोधक प्राध्यापक माजिद इज्जती यांनी सांगितलं की, ‘यापैकी अनेक राष्ट्र ही अनेक द्वीपसमूह मिळून तयार झालेली आहेत. इथल्या लोकांचे आरोग्य तिथे असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.’ 1990 ते 2022 पर्यंतच्या या अहवालात मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपटीने वाढल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, प्रौढ लोकांमध्ये स्त्रियांच्या लठ्ठपणाचा दर दुप्पट आणि पुरुषांमध्ये जवळजवळ तिप्पट आहे. त्याचवेळी, कमी वजनाच्या लोकांच्या टक्केवारीत 50 टक्क्यांची घट झाल्याचं अहवालात जरी म्हटलं असलं तरी ती अजूनही एक गंभीर समस्या आहे.
Latest Marathi News जगभरात एक अब्जहून अधिक लठ्ठ माणसं! Brought to You By : Bharat Live News Media.