प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापक शिक्षक यांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या उठल्या होत्या. मात्र, असे काहीही नसून कोरोनामुळे रखडलेली 30 टक्के प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता नव्याने राेस्टर भरून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करावी अशा सूचना  शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. नाशिक दाैऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत … The post प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही appeared first on पुढारी.

प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापक शिक्षक यांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या उठल्या होत्या. मात्र, असे काहीही नसून कोरोनामुळे रखडलेली 30 टक्के प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता नव्याने राेस्टर भरून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करावी अशा सूचना  शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
नाशिक दाैऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाचालकांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करत चर्चा केली. यावेळी माजी मंत्री विजय नवलपाटील मविप्रचे ॲड. नितीन ठाकरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे डाॅ. अपुर्व हिरे, के. के. वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, केव्हीएन नाईक संस्थेचे हेमंत धात्रक आदी उपस्थित होते. शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण रिक्तजागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला हाेता. मात्र, काेराेनानंतर महसूल कमी झाल्याने वित्त विभागाकडून ५० टक्के प्राध्यापक पदांसाठी भरतीस हिरवा कंदील दाखविला हाेता. संस्थांच्या अंतर्गत वादामुळे ३० टक्के भरती प्रक्रिया रखडली हाेती. आता वित्त विभागाने ३० टक्के भरतीला मान्यता दिल्याचेही शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सांगितले.
हेही वाचा:

Nashik …तर शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
नाशिक : … म्हणून महाराष्ट्राला स्थान नाही; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका
Lal Vadal : तोंडी नव्हे तर अंमलबाजवणीची खात्री करूनच माघारी फिरू… लाल वादळाची भूमिका

Latest Marathi News प्राध्यापकांच्या नोकरीला धोका असल्याचा वावड्या; असे काहीही नाही Brought to You By : Bharat Live News Media.