कोल्हापूर : डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्ताने परगावी गेलेल्या डॉक्टर दाम्पत्याचा टेंबलाईवाडी येथील कलानंद को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील बंद बंगला फोडून चोरट्यांनी 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाखांच्या ऐवजांवर डल्ला मारला. 13 ते 14 नोव्हेंबर या काळात ही घटना घडली. दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. भरवस्तीतीत घडलेल्या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
घटनेला आठवड्याचा कालावधी होऊनही राजारामपुरी पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली आहे. माध्यमांना घटनेचा सुगावा लागू नये, याचीही खबरदारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.
डॉ. सरिता गजानन चौगुले (वय 39, रा. टेंबलाईवाडी) यांचा उचगाव (ता. करवीर) येथे स्वत:चा दवाखाना आहे. पती डॉ. गजानन हे शिरोळ येथील साखर कारखान्याच्या रुग्णालयात नोकरी करतात. आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पती नवी दिल्लीला गेले आहेत. फिर्यादी दोन मुलीसह 13 नोव्हेंबरला माहेरी मिरजेला गेल्या होत्या. बंद बंगला हेरून प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा उचकटून बेडरूममधील दोन्हीही कपाटे फोडून त्यातील 25 तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व दहा हजाराची रोकड असा 14 लाख 5 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. 14 रोजी वृद्ध सासरे नामदेव चौगुले यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
दोन लाखांचा डायमंड सेट लंपास
चोरट्यांनी दोन लाखांचा डायमंड सेट लंपास केला. याशिवाय डायमंडची अंगठी, साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र, 5 तोळ्याचा नेकलेस, चार तोळ्याची सोन्याची साखळी, 2 तोळ्याच्या 4 अंगठ्या, सोन्याच्या 3 जोड रिंगा, 10 हजाराची रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दिवाळीत घरफोड्या वाढल्या
ऐन दिवाळीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात सराईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडीसह वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊनही आजवर एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. चोरटे जोमात अन् पोलिस कोमात अशीच परिस्थिती आहे.
The post कोल्हापूर : डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्ताने परगावी गेलेल्या डॉक्टर दाम्पत्याचा टेंबलाईवाडी येथील कलानंद को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील बंद बंगला फोडून चोरट्यांनी 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाखांच्या ऐवजांवर डल्ला मारला. 13 ते 14 नोव्हेंबर या काळात ही घटना घडली. दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. भरवस्तीतीत घडलेल्या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. घटनेला आठवड्याचा कालावधी …
The post कोल्हापूर : डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले appeared first on पुढारी.