आमदार नितेश राणे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १५ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे सक्त आदेश माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दिले. न्यायालयाने राणे यांच्याविरोधात १५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
वारंवार बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आ.राणें यांच्याविरूद्ध खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. या खटल्याची दखल घेत दंडाधिकारी संग्राम काळे यांनी १६ ऑक्टोबरला राणेंविरूद्ध समन्स बजावले होते. आज मंगळवारी या दाव्यावर दंडाधिकारी संग्राम काळे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी नितेश राणेंनी न्यायालयासमोर गैरहजर राहिल्याने खासदार राऊत यांच्यातर्फे अॅड. मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला. राणेंना समन्स पोहोच झाले आहे. मात्र ते जाणूनबुजून गैरहजर राहिल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि नितेश राणे यांच्याविरूद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले. स्पीड पोस्टने नितेश राणेंच्या कणकवलीच्या पत्त्यावर वॉरंट बजावण्याचे निर्देशही दिले.
Mumbai court issued a bailable warrant of Rs 15,000 against BJP MLA Nitesh Rane in connection with a defamation complaint lodged against him by Uddhav Thackeray Faction leader Sanjay Raut. Further hearing to take place on 15th December (21/11)
— ANI (@ANI) November 22, 2023
हेही वाचा :
कागदपत्रे सादर करण्यास शिंदे गटाने मागितली वेळ
‘मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी गरज पडल्यास कृत्रिम पाऊस पाडू’
‘आ बैल, मुझे मार’, संजय राऊतांचे नवे ट्वीट
दोन पवारांच्या वकिलांची आयोगासमोर खडाजंगी
The post आमदार नितेश राणे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश appeared first on पुढारी.
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १५ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे सक्त आदेश माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दिले. न्यायालयाने राणे यांच्याविरोधात १५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वारंवार बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आ.राणें यांच्याविरूद्ध खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात …
The post आमदार नितेश राणे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश appeared first on पुढारी.