माेठी बातमी : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई ओढावून घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) ६ आमदारांना अपात्र ठरवले आहे. काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेवर अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला होता.
विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी बुधवारी ( दि.२८ फेब्रुवारी) दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. व्हीप जारी असतानाही भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे. याशिवाय अर्थसंकल्प मंजूर करताना सभागृहात अनुपस्थित राहिल्याचे आरोप काँग्रेस आमदार राजेंद्र राणा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो, इंद्रदत्त लखनपाल आणि चैतन्य शर्मा यांच्यावर होता. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) ६ आमदारांना अपात्र ठरवले आहे.
Himachal Pradesh Assembly Speaker Kuldeep Singh Pathania says, “Six MLAs, who contested on Congress symbol, attracted provisions of anti-defection law against themselves…I declare that the six people cease to be members of the Himachal Pradesh Assembly with immediate effect.” pic.twitter.com/lxWMKGUREw
— ANI (@ANI) February 29, 2024
राज्यसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी वेगावल्या
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगावल्या. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित केले. दिवसभरातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर बुधवारी रात्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यानंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय नाट्यावर पडदा पडला.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने मारली बाजी
हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते.
काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार अस्थिर झाल्याची चर्चा सुरु झाली. तसेच सुक्खू यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे दिला असल्याचे वृत्तही समोर आले. मात्र काही वेळातच सुक्खू यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचा खुलास केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाठवले. (Rajya Sabha Election 2024)
भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंह गांधी, दिलीप ठाकूर आदी १५ भाजप आमदारांवर आज विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले. हिमाचल प्रदेशमधील ६८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ४०, भाजपचे २५ आणि तीन अपक्ष आमदार आहेत.
The post माेठी बातमी : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र appeared first on Bharat Live News Media.