बाप रे बाप! विष्णू मनोहर यांनी केला 10 हजार किलोचा मसाले भात
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात आदिवासी बांधव मेळाव्यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 10 हजार किलोचा मसाले भात बनविला आहे. 25 हजार लोकांची उपस्थिती गृहीत धरता
१८०० किलो तांदूळ, ५०० किलो बटाटे, ३०० किलो तेल, १०० किलो मिरची, तीनशे किलो मटर, पाचशे किलो बटाटे पाचशे किलो कांदे आदी साहित्याचा उपयोग करत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा दहा हजार किलो मसाले भात तयार केला आहे. आदिवासींमधील अनेक समूह आणि जाती ख्रिश्चन तसेच मुस्लिम झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ जाती नुसार ओबीसी व अनुसूचित जातीच्या सवलती मिळत आहेत. त्या बंद करण्यात याव्या यासाठी जनजाती सुरक्षा मंचतर्फे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी महामेळावा आयोजित करण्यात आला. या महामेळाव्यासाठी देशभरातून २५ हजारपेक्षा जास्त आदिवासी आले आहेत. या उपस्थितांच्या भोजनाची सोय व्हावी हे उद्दिष्ट ठेवून विष्णू मनोहर यांनी दहा हजार किलोचा मसाले भात तयार केला. मंगळवारी (दि. २१) पहाटे तीन वाजता बजाज नगरातील विष्णूजी की रसोई येथे एका मोठ्या कढईमध्ये हा मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. या मसाले भाताचे आलेल्या आदिवासी बांधवांना मैत्री परिवारातर्फे वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिली.
The post बाप रे बाप! विष्णू मनोहर यांनी केला 10 हजार किलोचा मसाले भात appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात आदिवासी बांधव मेळाव्यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 10 हजार किलोचा मसाले भात बनविला आहे. 25 हजार लोकांची उपस्थिती गृहीत धरता १८०० किलो तांदूळ, ५०० किलो बटाटे, ३०० किलो तेल, १०० किलो मिरची, तीनशे किलो मटर, पाचशे किलो बटाटे पाचशे किलो कांदे आदी साहित्याचा उपयोग करत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर …
The post बाप रे बाप! विष्णू मनोहर यांनी केला 10 हजार किलोचा मसाले भात appeared first on पुढारी.