“अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…” : टीम इंडियावर आफ्रिदीची बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्‍यात संघ पराभूत झाला असला तरी देशातील क्रिकेट चाहत्‍यांना कर्णधार रोहित शर्मा व टीम इंडियाच्‍या यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील कामगिरीचा अभिमान आहे. मात्र भारताच्‍या पराभववार आता पाकिस्‍तानचे आजी-माजी क्रिकेटपटू तोंडसुख घेत आहेत. पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने टीम … The post “अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…” : टीम इंडियावर आफ्रिदीची बोचरी टीका appeared first on पुढारी.
“अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…” : टीम इंडियावर आफ्रिदीची बोचरी टीका


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्‍यात संघ पराभूत झाला असला तरी देशातील क्रिकेट चाहत्‍यांना कर्णधार रोहित शर्मा व टीम इंडियाच्‍या यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील कामगिरीचा अभिमान आहे. मात्र भारताच्‍या पराभववार आता पाकिस्‍तानचे आजी-माजी क्रिकेटपटू तोंडसुख घेत आहेत. पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने टीम इंडिया आणि चाहत्‍यावर बोचरी टीका केली आहे.
अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…
पाकिस्‍तानमधील समा टीव्‍हीशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्‍हणाला की, “जेव्हा तुम्ही सतत जिंकता तेव्हा अतिआत्मविश्वासही खूप वाढतो. त्यामुळे ही गोष्ट तुमचा जीव घेते.” भारतीय संघाने सलग १० सामने जिंकून २०२३ चा विश्वचषकमधील फायनलचे तिकीट मिळवले. रोहित शर्मा याच्‍या नेतृत्त्‍वाखालील टीम इंडियाची कामगिरी दमदार होती आणि भारतीय संघ प्रत्येक मोठ्या संघावर वर्चस्व गाजवताना दिसला.
भारतीय क्रिकेट चाहत्‍यांवरही टीका
आफ्रिदीने भारतीय क्रिकेट चाहत्‍यांवरही टीका केली, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ऑस्‍ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्‍या दमदार कामगिरीला दाद दिली नाही. मला वाटतं की, आम्ही सर्वांनी आमच्या कारकिर्दीत याचा सामना केला आहे. आम्ही चौकार, शतक किंवा विकेट काढायचो तेव्हा भारतीय प्रेक्षकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसे.”
रविवारच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावले तेव्हाही भारतीय चाहते शांत होते. खेळावर प्रेम करणारा देश प्रत्येक खेळाडूचे आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करतो; पण सुरशिक्षित भारतीय प्रेक्षकतसे करत नाहीत. प्रेक्षक हेडचे शतक खूप मोठे होते आणि किमान काही लोकांनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवायला हव्या होत्या, असे सांगत त्‍याने भारतीय चाहत्‍यांवरही टीका केली.

The post “अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…” : टीम इंडियावर आफ्रिदीची बोचरी टीका appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्‍यात संघ पराभूत झाला असला तरी देशातील क्रिकेट चाहत्‍यांना कर्णधार रोहित शर्मा व टीम इंडियाच्‍या यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील कामगिरीचा अभिमान आहे. मात्र भारताच्‍या पराभववार आता पाकिस्‍तानचे आजी-माजी क्रिकेटपटू तोंडसुख घेत आहेत. पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने टीम …

The post “अतिआत्‍मविश्‍वास तुमचा जीव घेतो…” : टीम इंडियावर आफ्रिदीची बोचरी टीका appeared first on पुढारी.

Go to Source