चंद्रपूर : १५ हजाराची लाच घेताना मनपा लिपीक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : १५ हजाराची लाच घेताना महापालिकेतील लिपीकाला शुक्रवारी (दि.२३) रंगेहाथ अटक करण्यात आली. फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख असे त्याचे नाव आहे. प्लॉट मालमत्तेवर भोगवटदार म्हणून नावे लावण्यासाठी त्याने १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आज त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या … The post चंद्रपूर : १५ हजाराची लाच घेताना मनपा लिपीक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात appeared first on पुढारी.
चंद्रपूर : १५ हजाराची लाच घेताना मनपा लिपीक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : १५ हजाराची लाच घेताना महापालिकेतील लिपीकाला शुक्रवारी (दि.२३) रंगेहाथ अटक करण्यात आली. फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख असे त्याचे नाव आहे. प्लॉट मालमत्तेवर भोगवटदार म्हणून नावे लावण्यासाठी त्याने १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आज त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने दोन प्लॅट विकत घेतले आहेत. या प्लॅटवर भोगवटदार म्हणून आपल्यासह मुलांची नावे लावण्यासाठी त्याने महापालिकेत अर्ज दिला होता. त्यानंतर महानगरपालिकेतील कर लिपीक फारूख शेख याने तक्रारदाराकडे १५ हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रादाराकडून १५ हजाराची लाच घेताना फारूख शेख याला सापळा रचून लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले,सहकारी रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, नरेश नन्नावरे, राज नेवारे, ना.पो.अ. संदेश वाघमारे रोशन चांदेकर, पो.अं. वैभव गाडगे, चालक पोशी सतीश सिडाम यांनी केली.
हेही वाचा :

चंद्रपूर : अखेर मृत्यूशी झुंज संपली, मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू
Nashik News : व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा
Nashik Crime News : वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास

Latest Marathi News चंद्रपूर : १५ हजाराची लाच घेताना मनपा लिपीक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.