Pune Drugs Case : ड्रग प्रकरणाचा गोपनीय अहवाल न्यायालयात
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. तपासादरम्यान आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनची शक्यता असल्यासंदर्भात काही गोष्टी उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आली. याप्रकरणातील ललित पाटीलसह बारा जणांची पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना सोमवारी (दि. 20) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ड्रग्जची निर्मिती, ड्रग्जची साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकार्यांसह सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. तर, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याने आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार, इम—ान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या पोलीस कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला. तर, सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, प्रज्ञा कांबळे या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा
IFFI : इफ्फी उद्घाटन सोहळ्यात पंकज त्रिपाठीच्या ‘कडक सिंग’चा ट्रेलर रिलीज
एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण
Pune News : मराठी भाषा पालिकेसाठी परकीच
The post Pune Drugs Case : ड्रग प्रकरणाचा गोपनीय अहवाल न्यायालयात appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. तपासादरम्यान आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनची शक्यता असल्यासंदर्भात काही गोष्टी उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आली. याप्रकरणातील ललित पाटीलसह बारा जणांची पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना सोमवारी (दि. 20) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे …
The post Pune Drugs Case : ड्रग प्रकरणाचा गोपनीय अहवाल न्यायालयात appeared first on पुढारी.