PM मोदींचे ‘धैर्या’चे शब्‍द…’चांद्रायान’ मोहिम फत्ते…आता मिशन २०२४ वर्ल्ड कप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खेळ असो की कोणतेही क्षेत्र जय-पराजय हा जगण्‍यातील एक भाग असतो. सातत्‍याने यश मिळत नसते आणि अपयशही कायमस्‍वरुपी टीकत नाही. तरीही यशाला अनेक धनी असतात आणि अयपश हे पोरके असते. त्‍यामुळेच पोरके असलेल्‍या अपयशी व्‍यक्‍तींवर चौहीबाजूंनी टीकेचा मारा तर ठरलेलाच असताे. या शाब्‍दिक बाणांनी पराभूत झालेल्‍यांचे आणखी खच्‍चीकरण होते. मात्र याचचेळी … The post PM मोदींचे ‘धैर्या’चे शब्‍द…’चांद्रायान’ मोहिम फत्ते…आता मिशन २०२४ वर्ल्ड कप appeared first on पुढारी.
PM मोदींचे ‘धैर्या’चे शब्‍द…’चांद्रायान’ मोहिम फत्ते…आता मिशन २०२४ वर्ल्ड कप


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खेळ असो की कोणतेही क्षेत्र जय-पराजय हा जगण्‍यातील एक भाग असतो. सातत्‍याने यश मिळत नसते आणि अपयशही कायमस्‍वरुपी टीकत नाही. तरीही यशाला अनेक धनी असतात आणि अयपश हे पोरके असते. त्‍यामुळेच पोरके असलेल्‍या अपयशी व्‍यक्‍तींवर चौहीबाजूंनी टीकेचा मारा तर ठरलेलाच असताे. या शाब्‍दिक बाणांनी पराभूत झालेल्‍यांचे आणखी खच्‍चीकरण होते. मात्र याचचेळी धैर्य देणारा एक शब्‍द अपयशी ठरलेल्‍यांना लढण्‍याचे असीम बळ देतो. हे प्रेरणादायी शब्‍द  पुन्‍हा ध्‍येयाचे शिखर सर करण्‍यासाठी नवी उर्जाच प्रदान करतात. असचं काहीसं पुन्‍हा होणार का, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. याला निमित्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍वचषक स्‍पर्धेत अंतिम सामन्‍यात पराभूत झालेल्‍या टीम इंडियाच्‍या भेटीचे…(WC 2023 & PM Modi)
‘चांद्रयान’च्‍या अपयशानंतर मोदींच्‍या पाठबळावर इस्‍त्रोने केली होती मोहिम फत्ते
दिवस होता ६ सप्‍टेंबर २०१९. चांद्रयान मोहिम २ साठी इस्रो सज्‍ज होते. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-2 च्या विक्रम मॉड्यूलला सॉफ्ट लँड करण्याची इस्रोची योजना स्क्रिप्टनुसार पूर्ण झाली नाही, लँडरने त्याच्या अंतिम उतरण्याच्या वेळी ग्राउंड स्टेशनशी संपर्क गमावला. इस्रोने शास्त्रज्ञांना संबोधित केल्यानंतर काही तासांनंतर त्याचा लँडरशी संपर्क तुटल्याचे जाहीर केले होते. अखेरच्‍या क्षणी विक्रम लँडशी संपर्क तुटला आणि देशभरातील खगोल प्रेमींमध्‍ये निराशा पसरली. चांद्रयान 2 लँडर ‘विक्रम’ चा चंद्रावर उतरण्याच्या वेळीच अंतराळ संस्थेचा संपर्क तुटल्याने सिवन प्रचंड निराश झाले होते.
इस्‍त्रोचे तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाले तो प्रसंग…
हिंमत गमावू नका…
चांद्रयान -2 मोहिम अयशस्‍वी ठरल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला तुमची मनाची चौकट समजली, तुमच्या डोळ्यातील नजर खूप काही सांगून गेली. त्यामुळेच मी इथे फार काळ थांबलो नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही कदाचित चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलो नसतो… तुम्ही शक्य तितके जवळ आलात, स्थिर रहा आणि पुढे पहा.” आपल्या भाषणानंतर मोदींनी शास्त्रज्ञांशी हस्तांदोलन करत प्रोत्साहनाच्या शब्दांत त्यांना पुढे पाहण्यास सांगितले आणि हिंमत गमावू नका असे सांगितले. यावेळी मोदींच्या प्रेरणेचे शब्दांनी इस्‍त्रोचे तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन अश्रू रोखू शकले नाहीत. बेंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाच्या बाहेर अश्रूंनी भरलेल्या शिवनला मिठी मारताना आणि सांत्वन करताना मोदी दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाले हाेते.
पंतप्रधान मोदी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्वच खेळाडूंना दिलासा दिला…
WC 2023 & PM Modi : ‘मुस्कुराइए भाई, देश आपको देख रहा है
ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तिथे त्यांनी खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मानसिक धक्क्यात गेली. नेमके त्याच वेळी पंतप्रधान मोदी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्वच खेळाडूंना दिलासा दिला. (PM Modi met Team India)रोहित आणि विराटचा हात हातात घेत पीएम मोदी त्यांना, ‘मुस्कुराइए भाई, देश आपको देख रहा है।’ असे म्हणाले.
आता साेशल मीडियावर विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यातील पराभवानंतर  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी टीम इंडियाच्‍या खेळाडूंची घेतलेल्‍या भेटीचे आणि चांद्रयान 2 माेहिमेला अपयश आल्‍यानंतर  इस्‍त्रो शास्त्रज्ञ आणि तत्‍कालिन अध्‍यक्ष के सिवन  यांच्‍या भेटीशी तुलना हाेत आहे. कारण २०१९ मध्‍ये चांद्रायान माेहिम अपयशी ठरली तरी  नव्‍या उमेदीने इस्‍त्रो शास्त्रज्ञांनी  २०२३ मध्‍ये चांद्रायान ३ ही माेहीम यशस्‍वी केली. आता पुढील वर्षी म्‍हणजे २०२४ मध्‍ये T-20 विश्‍वचषक स्‍पर्धा आहे. टीम इंडियाचे खेळाडूही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिलेल्‍या धैर्याच्‍या जाेरावर पुढील विश्‍वचषकावर भारताचं नाव काेरतील, अशी चर्चा  साेशल मीडियावर रंगली आहे.

Thank you so much for your heartwarming wishes sir 💙🙏 #PMModi #NarendraModi pic.twitter.com/6pIvUambQd
— Viral Kohli (@ImViralKohli) November 21, 2023

हेही वाचा :

चांद्रयान-3 च्या यशासाठी अमिताभ बच्चन म्हणाले… ‘चंद्राच्या मातीवर आपल्या देशाच्या पावलांचे ठसे उमटतील’
Chandrayaan-3 Mission | ब्रेकिंग! चांद्रयान-३ आजच चंद्रावर उतरणार; इस्रोने दिली मोठी अपडेट
Chandrayaan 3 Moon Landing | इतिहास घडवण्यासाठी अवघे काही तास बाकी; चांद्रयान-३ मोहिमेला द्या ‘या’ शुभेच्छा अन् संदेश
Chandrayaan 3 Moon Landing | इतिहास घडवण्यासाठी अवघे काही तास बाकी; चांद्रयान-३ मोहिमेला द्या ‘या’ शुभेच्छा अन् संदेश
टीम इंडिया पुन्हा ऑस्ट्रेलियाला भिडणार! 2 दिवसांनी पुन्हा…
ICCने निवडला वर्ल्डकपचा सर्वोत्कृष्ट संघ, रोहित बनला ‘कॅप्टन’
विजयाचा उन्माद आणि बेधुंदी..! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे संतापजनक वर्तन

The post PM मोदींचे ‘धैर्या’चे शब्‍द…’चांद्रायान’ मोहिम फत्ते…आता मिशन २०२४ वर्ल्ड कप appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खेळ असो की कोणतेही क्षेत्र जय-पराजय हा जगण्‍यातील एक भाग असतो. सातत्‍याने यश मिळत नसते आणि अपयशही कायमस्‍वरुपी टीकत नाही. तरीही यशाला अनेक धनी असतात आणि अयपश हे पोरके असते. त्‍यामुळेच पोरके असलेल्‍या अपयशी व्‍यक्‍तींवर चौहीबाजूंनी टीकेचा मारा तर ठरलेलाच असताे. या शाब्‍दिक बाणांनी पराभूत झालेल्‍यांचे आणखी खच्‍चीकरण होते. मात्र याचचेळी …

The post PM मोदींचे ‘धैर्या’चे शब्‍द…’चांद्रायान’ मोहिम फत्ते…आता मिशन २०२४ वर्ल्ड कप appeared first on पुढारी.

Go to Source