एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर-पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे प्रवासी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालकाने गीअर कंट्रोल करीत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे एसटी बसमध्ये असणार्‍या जवळपास 70 प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना कळकाई- बेलसरवाडी येथे सोमवार, दि.20 … The post एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर-पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे प्रवासी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालकाने गीअर कंट्रोल करीत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे एसटी बसमध्ये असणार्‍या जवळपास 70 प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना कळकाई- बेलसरवाडी येथे सोमवार, दि.20 रोजी 3.30 वाजता घडली.
संबंधित बातम्या :

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील कुपोषण लवकरच संपवणार : राज्यपाल रमेश बैस
अत्यल्प पावसामुळे मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ
Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे वेडे राजकारणी: खा. कृपाल तुमाने

याबाबत अधिक माहिती अशी, की मंचर एसटी आगाराची एसटी बस मंचर बसस्थानकातून पिंपळगावमार्गे पारगाव कारखाना बस ही प्रवाशांना घेऊन निघाली होती. संतोष नारायण लांडे चालक आणि वाहक चंद्रकांत चपटे हे प्रवाशांना घेऊन निघाले होते. यात जवळपास 78 प्रवासी होते. पिंपळगावच्या आसपास एसटी गाडीतून 8 प्रवासी खाली उतरले. गाडीला ब्रेक थोडा कमी होता. त्यामुळे गाडीचा स्पीड कमी होता. मात्र, एसटीत प्रवासी अधिक असल्याने गाडी कमी वेगाने चालली होती.
एसटी गाडी चालवत असताना एसटी गाडीचा हवेचा पाईप तुटला आणि त्यातच ब्रेक फेल झाला. गाडीची हवा गेल्यानंतर गाडी गीअरवर कंट्रोल करून कशीबशी चालकाने स्लो केली. मात्र, प्रवाशांना याबाबत माहिती मिळताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यामुळे 70 प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाच्या या कामगिरीने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
The post एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर-पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे प्रवासी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालकाने गीअर कंट्रोल करीत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे एसटी बसमध्ये असणार्‍या जवळपास 70 प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना कळकाई- बेलसरवाडी येथे सोमवार, दि.20 …

The post एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

Go to Source