गावरान बोरांची आंबट-गोड चव झाली दुर्मीळ!
पुणे : दिवाळी संपली की आंबट-गोड-तुरट गावरान बोरांचा हंगाम सुरू होतो. परंतु गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची ही चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी बहुतेक सर्वच शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर असणारी बोराची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची आवक होताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला सर्रास गावरान बोरांची झाडे असायची. याच झाडांवरील गोड-आंबट-तुरट बोरांचा लहान-मोठ्यांसाठी चांगला रानमेवा असायचा.
गावाकडे दिवाळीची सुटी पडली की कोणत्या बोरांच्या झाडाची बोरं चांगली याची चर्चा बच्चे कंपनीमध्ये सुरू व्हायच्या. त्यानुसार प्लॅन करून बोराच्या झाडांवर मुलांची टोळी धाड टाकून मनसोक्त बोरं खाण्याचा आनंद लुटायची. परंतु आता वाढती बागायत शेती, जमीन सपाटीकरण यामुळे ही बांधावरील बोरांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळेच दिवाळीच्या काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली आहेत. संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली आहे. नवीन पिढीतील मुलांना तर या गावरान बोरांची चवदेखील माहीत नाही.
गावरान बोरांची ही चव सर्वांना हवीहवीशी आणि न्यारी असे. या बोरांचा हंगाम ऐन संक्रांतीच्या तोंडावर येतो. ही गावठी बोरे लहान-थोरांपासून अगदी सगळ्यांना भुरळ घालतात. संक्रांतीच्या सणात वाण म्हणून गावठी बोरांना महत्त्वाचं स्थान आहे. तसेच या बोरांचे आहारात महत्त्वाचे स्थान आहे. ही बोरे खाल्ल्याने पचन लवकर होते. तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आदी औषधी गुणधर्म असल्याने शरीराला ही बोरे फायदेशीर ठरतात.
दर ही चांगले
गावरान बोरांना मागणी अन् दरदेखील चांगले मिळतात. गेल्या काही वर्षांत बहुतेक सर्व बाजारपेठांमध्ये चेकनट बोर, उमराण, चमेली, अॅपल बोर अशी विविध प्रकारची बोरं विक्रीसाठी येतात. यामध्ये ग्राहकांकडून गावरान बोरांना अधिक मागणी असते.
गावरान बोरांची झाडे कमी झाली आहेत. वृक्षतोडीमुळे शेताच्या बांधावर वाढणारी काटेरी गावरान बोरांची झाडे कमी होत आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात गावरान बोरं मात्र नामशेष होत आहेत.
– दादाभाऊ जाचक, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, वडगाव पाटोळे, ता. खेड.
हेही वाचा
Pune News : मराठी भाषा पालिकेसाठी परकीच
Pune : ’सोमेश्वर’चे दीड लाख टन गाळप पूर्ण
सावधान! वायू प्रदूषणामुळे आजारांना आमंत्रण
The post गावरान बोरांची आंबट-गोड चव झाली दुर्मीळ! appeared first on पुढारी.
पुणे : दिवाळी संपली की आंबट-गोड-तुरट गावरान बोरांचा हंगाम सुरू होतो. परंतु गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची ही चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी बहुतेक सर्वच शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर असणारी बोराची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची आवक होताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला सर्रास …
The post गावरान बोरांची आंबट-गोड चव झाली दुर्मीळ! appeared first on पुढारी.