पुणे : मराठी भाषा पालिकेसाठी परकीच
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाकडून मराठी भाषेविषयी उदासीनता दिसून येत असून, पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये चक्क मराठीतील शब्दांचे उच्चारानुसार स्पेलिंग करून ते इंग्रजीतून मांडण्यात आले आहेत.
मराठी भाषेमधून राज्यकारभार झाला पाहिजे, दुकानांवर मराठी पाट्या लावल्या जाव्यात, असा नेहमीच आग्रह असतो. मराठीमधून राज्यकारभारासाठी नेहमीच राजकारणी आणि राजकीय पक्ष आग्रही असतात, मात्र प्रत्यक्षात शासकीय कामात मराठीची अवहेलनाच होताना दिसते. महापालिकेच्या स्थायी समितीला सादर होणार्या प्रस्तावांमध्ये वारंवार इंग्रजीचा वापर होताना दिसतो.
पाणीपुरवठा विभागाचे नवी होळकर जलशुध्दीकरण केंद्राची एक निविदा स्थायी समितीने नुकतीच मान्य केली. या निविदेच्या विषयपत्रामध्ये 40 चङऊ झीरींळवळप घीहाींशलहश छर्रींळप केश्ररज्ञरी गरश्रीर्हीववहळज्ञरीरप घशपवीर ढळप तरीीहरपज्ञरीळींर उहरर्श्रींळपश अशा प्रकारे मराठी लिहिण्यात आले आहे. या प्रस्तावात काम दिलेल्या ठेकेदाराचे नावही इंग्रजीत आहे.
एकीकडे मराठी भाषेचा नागरिकांमध्ये प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी महापालिकेची मराठी भाषा समिती आहे. मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी ही समिती काम करते. मराठी साहित्यासाठी पुरस्कार महापालिका देते. तर दुसरीकडे मराठी शब्द इंग्रजीतून वापरून मराठी भाषेचा अवमान करत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा
Pune : ’सोमेश्वर’चे दीड लाख टन गाळप पूर्ण
सावधान! वायू प्रदूषणामुळे आजारांना आमंत्रण
Crime News : वाईन शॉपीवर सशस्त्र दरोडा; रोकड लंपास
The post पुणे : मराठी भाषा पालिकेसाठी परकीच appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाकडून मराठी भाषेविषयी उदासीनता दिसून येत असून, पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये चक्क मराठीतील शब्दांचे उच्चारानुसार स्पेलिंग करून ते इंग्रजीतून मांडण्यात आले आहेत. मराठी भाषेमधून राज्यकारभार झाला पाहिजे, दुकानांवर मराठी पाट्या लावल्या जाव्यात, असा नेहमीच आग्रह असतो. मराठीमधून राज्यकारभारासाठी नेहमीच राजकारणी आणि राजकीय पक्ष आग्रही असतात, मात्र …
The post पुणे : मराठी भाषा पालिकेसाठी परकीच appeared first on पुढारी.