
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चंदीगड महापौरपदाची निवडणूक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. चंदीगड महापौर निकालात सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच हस्तक्षेप केला. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत चंदीगड प्रशासाने आप आणि काँग्रेसच्या उमेदवाराची अवैध ठरवलेली ‘ती’ ८ मते वैध असल्याचे म्हटले आहे. तसेच महापौर निवडणुकीच्या फेरमतमोजणीचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. यामुळे चंदीगड महापौर निवडणुकीत ‘आप’ला मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सर्व अवैध ८ मतपत्रिकांमध्ये AAP महापौर उमेदवार कुलदीप कुमार यांच्याच बाजूने मते पडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेतील बँलेट पेपर म्हणजेच मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओचा आधार घेत निर्णय दिला आहे. (Chandigarh Mayor Election)
चंदीगड महापौर मतदान, मतमोजणी आणि निकालादरम्यान ‘घोडेबाजार’ झाल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. या निकालाविरोधात ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर सुनावणीवेळी न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला फटकारले. त्यानंतर येथील प्रशासनाला मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने हे पुरावे सादर केले. यानंतर न्यायालयाने आज (दि.२०) पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘ती’ ८ मते वैध ठरवत फेरमतमोजणीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Chandigarh mayoral polls: Supreme Court takes into note that all invalidated eight ballots have votes cast in favour of the AAP Mayor Candidate Kuldeep Kumar. https://t.co/Eg3WDMRiPJ
— ANI (@ANI) February 20, 2024
Chandigarh Mayor Election : पीठासन अधिकाऱ्यावर कारवाई करा-न्यायालय
चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महापौर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसिह यांना फटकारले. निवडणुकीतील पीठासन अधिकारी अनिल मसिह निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करून यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. (Chandigarh Mayor Election)
चंदीगड महापौर निवडणूक निकालात ‘घोडेबाजार’, ‘आप’ची न्यायालयात धाव
३० जानेवारी रोजी झालेल्या महापौर निवडणुकीत प्रशासनाने नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी आठ नगरसेवकांची मते अवैध ठरविल्यानंतर भाजपचे मनोज सोनकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली. मात्र आम आदमी पक्षाचे नगरसेवक आणि महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी याला आव्हान देत उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Latest Marathi News चंदीगड महापौर निवडणुकीत ‘आप’ला मोठा दिलासा; ‘ती’ ८ मते वैध, फेरमतमोजणीचे SC चे निर्देश Brought to You By : Bharat Live News Media.
