छत्रपतींना अभिप्रेत काम उभे करू : आमदार संग्राम जगताप

छत्रपतींना अभिप्रेत काम उभे करू : आमदार संग्राम जगताप

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारून समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत आहे. महाराजांना अभिप्रेत असे काम विकासाच्या माध्यमातून शहरात उभे करू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, ज्ञानेश्वर काळे, सागर गुंजाळ, संपत नलावडे, संजीव भोर, विवेक नाईक आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. श्री विशाल गणपती मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असून, त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचे काम केले आहे.
माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून, या ठिकाणी प्रवासी, विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय देखील या ठिकाणी असल्यामुळे हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला असून, नियोजनबद्ध व दर्जेदार रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.
हेही वाचा

Crime News : भरदिवसा घर फोडून दीड लाखाची रोकडलंपास
किसान सभेच्या उपोषणास पाठिंबा; उन्हात 15 कि.मी.ची पायपीट
वडगाव दरेकरचे काम चार महिन्यांपासून बंदच : कोटी रुपये खर्च पाण्यात

Latest Marathi News छत्रपतींना अभिप्रेत काम उभे करू : आमदार संग्राम जगताप Brought to You By : Bharat Live News Media.