वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये तडका, बहिणही हॉट !

पुढारी ऑनलाईन डेस्क : वडील आमदार, बिहारच्या राजकीय घराण्याचा वारसा लाभलेली नेहा शर्मा. राजकीय क्षेत्रात न पडता (HBD Neha Sharma) बॉलिवूडकडे वळली. अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आयेशा शर्मा हीदेखील आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात उतरली. दोन्ही आमदाराच्या मुली. पण, चित्रपट क्षेत्रातील करिअर निवडलं. आज नेहा शर्मा टॉपची अभिनेत्री आहे, जी नेहमीच बोल्डनेससाठी ओळखली जाते. नेहा शर्माचा आज २१ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्य़ाबद्दल. (HBD Neha Sharma)
संबंधित बातम्या –
Sukhee Movie : शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला
Sanjay Gadhvi : धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन
कोण आहे नेहा शर्मा?
नेहा शर्मा ही बिहारच्या राजकीय घराण्यातून आलीय. ती काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मोठी मुलगी आहे. अजित शर्मा हे बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून २०१४, २०१५ आणि २०२० मध्ये निवडू आले होते. ते बिझनेसमनदेखील आहेत. नेहा शर्माने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात तमिळ चित्रपटातून केली होती. पण, तमिळमध्ये तिचे करिअर फारसे घडले नाही.
View this post on Instagram
A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)
नेहाने २००७ मध्ये तेलुगू चित्रपट ‘चिरुथा’तून सुरूवात केली होती. नेहा पहिल्यांदा बॉलीवूड ‘किसर’ इमरान हाशमी २०१० मध्ये ‘क्रुक’मध्ये दिसली होती. ‘तेरी मेरी कहानी’, क्या सुपर कूल है हम, जयंता भाई की लव्ह स्टोरी, यमला पगला दीवाना, हेरा फेरी ३ सह अन्य चित्रपटात ती दिसली. नेहाने ‘बिग बॉस-१३’ चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं होतं. तिने अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये कमला देवीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)
नेहाचे शिक्षण
तिने लंडनच्या पायनएप्ल डान्स स्टुडिओजमधून विविध विधिध डान्स फॉर्म्समध्ये ट्रेनिंग घेतलं आहे. तिने शालेय शिक्षण माउंट कारमेल स्कूल, भागलपूरमधून घेतले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्लीतून फॅशन डिझाईनचे शिक्षण घेतले. नेहा कथ्थक करते. अभिनयासोबतच नेहाला नृत्याचीही खूप आवड आहे. तिने कथ्थक देखील शिकले आहे, लंडनमधील पायनॅपल डान्स स्टुडिओमधून स्ट्रीट हिप हॉप, लॅटिन डान्सिंग साल्सा, मेरेंग्यू, जिव्ह आणि जॅझ या नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे.
View this post on Instagram
A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)
View this post on Instagram
A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)
The post वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये तडका, बहिणही हॉट ! appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : वडील आमदार, बिहारच्या राजकीय घराण्याचा वारसा लाभलेली नेहा शर्मा. राजकीय क्षेत्रात न पडता (HBD Neha Sharma) बॉलिवूडकडे वळली. अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आयेशा शर्मा हीदेखील आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात उतरली. दोन्ही आमदाराच्या मुली. पण, चित्रपट क्षेत्रातील करिअर निवडलं. आज नेहा शर्मा टॉपची अभिनेत्री आहे, जी नेहमीच बोल्डनेससाठी ओळखली जाते. …
The post वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये तडका, बहिणही हॉट ! appeared first on पुढारी.
