माढ्यात भाजपविरोधात रासपचाही शड्डू

फलटण, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वाधिक चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील घडामोडी आता लक्षवेधक ठरत आहेत. या जागेवरून महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच महायुतीतील एकेकाळचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाजपक्षानेही भाजपच्या विरोधात दंड थोपटून शड्डू ठोकला आहे. माढ्यात भाजप विरुद्ध रासप अशीच लढत होणार असून फसवणूक करणार्‍या भाजपला धडा … The post माढ्यात भाजपविरोधात रासपचाही शड्डू appeared first on पुढारी.

माढ्यात भाजपविरोधात रासपचाही शड्डू

फलटण, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात सर्वाधिक चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील घडामोडी आता लक्षवेधक ठरत आहेत. या जागेवरून महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच महायुतीतील एकेकाळचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाजपक्षानेही भाजपच्या विरोधात दंड थोपटून शड्डू ठोकला आहे. माढ्यात भाजप विरुद्ध रासप अशीच लढत होणार असून फसवणूक करणार्‍या भाजपला धडा शिकवा, असा एल्गार रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुकारला आहे.
फलटण येथे रासपच्या माढा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर यांनी भाजपवर जोेेरदार टीकास्त्र सोडले. यावेळी राज्याध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव माऊली सरगर, उपाध्यक्ष बबन वीरकर, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, भाऊसाहेब वाघ, वैशाली वीरकर, खंडेराव सरक उपस्थित होते.
जानकर म्हणाले, मी कधीही विधानसभा लढणार नाही. झालो तर मी खासदारच होईन. मी लढत राहिलो तर प्रकाश शेतकर्‍यांना मिळत
राहील, या भूमिकेतून मी काम करत राहणार आहे. मला कुठल्या पक्षाचे तिकीट मागायचे नाही, तर मी तिकीट देणारा नेता आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी केले, ते राष्ट्रीय नेते बनले. मी तुमच्या स्वाभिमानावर, तुमच्या बळावर हा झेंडा तयार केला तो खाली पडू दिला नाही. तो झेंडा महात्मा फुले यांच्या गावात तयार झाला तो अखेरपर्यंत पुढे घेऊन जाणार. देशभर फिरून हा झेंडा दूरवर नेला. मी मंत्री झालो पण एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. माझ्या पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांना नेतृत्वाची संधी मिळत आहे. आमच्यामुळे मागच्यावेळी तुम्हाला सत्ता मिळाली होती. आम्हाला जर विचारलं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू न देण्याची ताकद आमच्यात आहे. मी माढ्याबरोबर परभणीतूनही लढणार आहे. त्या ठिकाणाहून दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईलच. त्यानंतर विधानसभेत माझे 35 आमदार निवडून येतील.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा झाला नाही तरी आम्हाला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री ठरला जाणार नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणे लढणार आहे. कार्यकर्त्यांनी आपणाला कोणतरी पाठिंबा देईल या भ्रमात पडू नये. माढ्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचीच लढत होईल. इथले खासदार माझे मित्र आहेत. ते राष्ट्रीय नेते होऊ शकत नाहीत. ते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याला मत देणार की नेत्याला मत देणार हे ठरवा. मला राष्ट्रीय नेता होण्याची संधी द्या. मी तुमचा आहे. पक्ष तुमचा आहे. खटाव-माण, फलटण-कोरेगाव मधून दोन लाखाचे लीड द्या. मागील वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात त्यांना जिंकून देऊनही भाजपने आमच्याशी कटकारस्थान केले. विधानसभेच्या वेळी आदल्या दिवसापर्यंत माझ्या बरोबर सभा घेतल्या आणि दुसर्‍या दिवशी आपल्या पक्षाच्या बी फार्म ऐवजी भाजपने त्यांचा बी फार्म दोन ठिकाणी दिला. या कपटनीतीचा महादेव जानकर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकर यांचे काय मेरिट आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रास्तविक रमेश चव्हाण यांनी केले. आभार निलेश लांडगे यांनी मानले.
Latest Marathi News माढ्यात भाजपविरोधात रासपचाही शड्डू Brought to You By : Bharat Live News Media.