पणजी नटली अन् इफ्फी सजली; कलाकारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला रेड कार्पेट

पणजी; योगेश दिंडे : राजधानी पणजी इफ्फीनिमित्त नटली आहे. रस्तोरस्ती आकर्षक विद्युत रोषणाई, चित्रपटांचे पोस्टर, सिनेअभिनेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. यंदाचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दणक्यात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 9 नोव्हेंबरला संपल्या. त्यानंतर लगेचच इफ्फीच्या तयारीस वेग आला. कमी कालावधीत पणजीसह राज्यात इतर ठिकाणीही सौंदर्यीकरण, सुव्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान सरकार … The post पणजी नटली अन् इफ्फी सजली; कलाकारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला रेड कार्पेट appeared first on पुढारी.

पणजी नटली अन् इफ्फी सजली; कलाकारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला रेड कार्पेट

पणजी; योगेश दिंडे : राजधानी पणजी इफ्फीनिमित्त नटली आहे. रस्तोरस्ती आकर्षक विद्युत रोषणाई, चित्रपटांचे पोस्टर, सिनेअभिनेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. यंदाचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दणक्यात आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 9 नोव्हेंबरला संपल्या. त्यानंतर लगेचच इफ्फीच्या तयारीस वेग आला. कमी कालावधीत पणजीसह राज्यात इतर ठिकाणीही सौंदर्यीकरण, सुव्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान सरकार समोर होते.
काही कमी-अधिक त्रुटी असल्या तरी इफ्फीचा माहोल राजधानीत तयार झाला आहे. रेडकार्पेटही कलाकारांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पणजीतील मुख्य रहदारीच्या मार्गावरही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस नेमण्यात आले आहेत.
‘कदंब’वर मिथुनदा, हेमामालिनी…
पणजीत प्रवेश करताच कदंब बसस्थानकाशेजारील मुख्य सर्कलभौवती
सिनेसृष्टीचा मिथुनदा व गोविंदा, माधुरी दीक्षित, हेमामालिनी यांच्यासह अन्य सिनेकलाकारांचे कटआऊट पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे कदंब सिनेसृष्टी अवतरली की काय, असा भास होत आहे.
सिनेरसिक ‘योगसेतू’कडे…
गोवा मनोरंजन सोसायटीकडे सिनेरसिकांची मांदियाळी झाली आहे. देश-विदेशातून विद्यार्थी, चित्रपट चाहत्यांची सोमवारी गर्दी होत होती. समोरच असलेला ‘योगसेतू’कडे ते आकर्षित झाले नसते तर नवलच. अनेकांची पावले योगसेतूकडे वळली. परशुराम यांचा भव्य पुतळा न्याहाळण्याबरोबरच मांडवी तिरावरून फेरफटका मारण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
माधुरीच्या घायाळ अदांनी इफ्फीत चार चाँद
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने रेडकार्पेटला वेगळी उंची दिली. तिच्या घायाळ अदाकारांनी इफ्फीत चार चाँद लागले.
The post पणजी नटली अन् इफ्फी सजली; कलाकारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला रेड कार्पेट appeared first on पुढारी.

पणजी; योगेश दिंडे : राजधानी पणजी इफ्फीनिमित्त नटली आहे. रस्तोरस्ती आकर्षक विद्युत रोषणाई, चित्रपटांचे पोस्टर, सिनेअभिनेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. यंदाचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दणक्यात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 9 नोव्हेंबरला संपल्या. त्यानंतर लगेचच इफ्फीच्या तयारीस वेग आला. कमी कालावधीत पणजीसह राज्यात इतर ठिकाणीही सौंदर्यीकरण, सुव्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान सरकार …

The post पणजी नटली अन् इफ्फी सजली; कलाकारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला रेड कार्पेट appeared first on पुढारी.

Go to Source