आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा ‘व्हिप’ मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता; तर अधिक पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ठाकरे गटाने आक्रमक युक्तिवाद केला होता. या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष सोमवारी काय निर्णय सुनावतात, याबाबत उत्सुकता … The post आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी appeared first on पुढारी.

आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा ‘व्हिप’ मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता; तर अधिक पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ठाकरे गटाने आक्रमक युक्तिवाद केला होता. या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष सोमवारी काय निर्णय सुनावतात, याबाबत उत्सुकता असणार आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालमर्यादेत निकाल लावण्याच्या द़ृष्टीने काय प्रयत्न होतात, याकडे जाणकारांच्या नजरा असणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत ‘व्हिप’बाबत दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्या युक्तिवादावरील आपला निर्णय राखून ठेवतानाच दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याची मुदत 16 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राखून ठेवलेला निर्णय सुनावणार का, याबाबत उत्सुकता आहे. शिवाय, 21 नोव्हेंबारपासून नियमित सुनावणी होईल. 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे, 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. 31 डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, त्यासाठी दोन्ही गटांकडून मला सहकार्य लागेल. अधिवेशन काळातही सुनावणी होईल, असे विधानसभा अध्यक्षांनी मागील सुनावणीत स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे.

The post आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा ‘व्हिप’ मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता; तर अधिक पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ठाकरे गटाने आक्रमक युक्तिवाद केला होता. या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष सोमवारी काय निर्णय सुनावतात, याबाबत उत्सुकता …

The post आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी appeared first on पुढारी.

Go to Source