कागल : चेक पोस्ट नाक्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
कागल; पुढारी वृत्तसेवा : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली कागल येथील आर.टी.ओ चेक पोस्ट नाक्याजवळ महामार्गाच्या गटारीमध्ये पडून अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर देण्यात यावा व इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केल्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांनी आंदोलकांना चकवा देण्यासाठी रात्रीची ऊस वाहतूक सुरू केली आहे. सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने या कामाचा रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर चालकाला अंदाज न आल्यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह गटारी मध्ये पडला. यावेळी चालक व क्लिनर यांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.
The post कागल : चेक पोस्ट नाक्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही appeared first on पुढारी.
कागल; पुढारी वृत्तसेवा : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली कागल येथील आर.टी.ओ चेक पोस्ट नाक्याजवळ महामार्गाच्या गटारीमध्ये पडून अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर देण्यात यावा व इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केल्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांनी आंदोलकांना चकवा देण्यासाठी रात्रीची ऊस वाहतूक सुरू केली आहे. सध्या …
The post कागल : चेक पोस्ट नाक्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही appeared first on पुढारी.