ललितला पळून जाण्यास मदत करणारे पोलीस काळे, जाधव शासकीय सेवेतून बडतर्फ
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मदतीने ससून रूग्णालयातून ड्रग्जचे डिलींग होताना 2 कोटी 14 लाखांचे मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यावर चोख बंदोबस्त ठेवण्या ऐवजी त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोर्ट कंपनीचे पोलिस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव या दोघांना पोलिस दलातून बडतर्फ (शासकीय सेवेतून बडतर्फ) करण्यात आले आहे. नुकताच त्यांच्यावर निलंबनाची तसेच या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
नाथाराम काळे, अमित जाधव यांच्या तपासात समोर आलेल्या बाबी
नाथाराम काळे याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तो ललित याला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक्सरे काढण्यासाठी घेऊन गेला होता तेव्हा ललित झटका देऊन पळून गेला होता असे त्याने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात ललित पाटीलला काळे एक्सरेसाठी घेऊनच घेला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान ललित पाटील याला पळून जाण्यास मदत कणारा विनय अर्हानाचा चालक दत्तात्रय डोके याला स्वतःच्या मोबाईल फोनवरून तीन कॉल लावल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जाधव यानेही दोनदा डोके याला फोन लावल्याचे निष्पन्न झाले आहे. 2 ऑक्टोबरला ससून रूग्णालातून ललित पाटील हा चालत जात असल्याचे दिसत असून काळे आणि अमित जाधव दोघेही हॉस्पिटलच्या मधील कॅन्टीन जवळ एकत्रितरित्या टाळी देताना दिसले. तसेच ललित पाटील गेल्यानंतर गणवेशावर दुसरा शर्ट परिधान केल्याचे सीसीटिव्ही फुटेज वरून दिसून आले आहे. तसेच ललित पाटील लेमन ट्री हॉटेलमध्ये शिरल्यानंतर काळे हा हॉटेलच्या व्यवस्थापकाबरोबर बोलत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचा बनाव करून तीन तासानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती उशीरा दिल्याने पोलिस सतर्क होऊ शकले नाही. त्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास काळे आणि जाधव यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. काळे याच्यावर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी 2014 मध्ये गुन्हा दाखल होता. त्यावेळीही काळेचे निलंबन झाले होते. वर्तुवणुकी बदल न झाल्याने पोलिसांना ललित प्रकरणात खोटा व दिशाभुल करणारी माहिती दिल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने काळे यांना अपर पोलिस आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया यांनी बंडतर्फ करण्याचे आदेश दिले.
The post ललितला पळून जाण्यास मदत करणारे पोलीस काळे, जाधव शासकीय सेवेतून बडतर्फ appeared first on पुढारी.
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मदतीने ससून रूग्णालयातून ड्रग्जचे डिलींग होताना 2 कोटी 14 लाखांचे मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यावर चोख बंदोबस्त ठेवण्या ऐवजी त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोर्ट कंपनीचे पोलिस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव या दोघांना पोलिस दलातून …
The post ललितला पळून जाण्यास मदत करणारे पोलीस काळे, जाधव शासकीय सेवेतून बडतर्फ appeared first on पुढारी.