Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्यात ‘राम’ नाही, या अर्थाने विरोधक आजपर्यंत त्यांच्याकडे पाहत आले. मात्र गेल्या वर्षात लोकसभेच्या दृष्टीने केलेली मोर्चेबांधणी, सोबतच भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि भाजपचे युवा नेते संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पाठबळामुळे आमदार लंके यांच्यात आता खर्‍या अर्थाने राजकीय ‘राम’ आल्याचे दिसते आहे. … The post Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी appeared first on पुढारी.

Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी

संदीप रोडे

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्यात ‘राम’ नाही, या अर्थाने विरोधक आजपर्यंत त्यांच्याकडे पाहत आले. मात्र गेल्या वर्षात लोकसभेच्या दृष्टीने केलेली मोर्चेबांधणी, सोबतच भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि भाजपचे युवा नेते संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पाठबळामुळे आमदार लंके यांच्यात आता खर्‍या अर्थाने राजकीय ‘राम’ आल्याचे दिसते आहे. नगर जिल्हा भाजपमध्ये गटबाजी नसल्याचा दावा केला जात असला, तरी आमदार राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांच्याशी लंके यांचे असलेले सख्य पाहता खासदार डॉ. सुजय विखे यांची वाट बिकट होत गेल्यास नवल वाटू नये !
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तिघांची सत्ता आहे. याच सत्ता समीकरणाचा लाभ घेत आमदार लंके यांनी भाजपच्या दोन बलाढ्य नेत्यांना आपलेसे करण्यात यश मिळविले. ज्या कोल्हे आणि शिंदे यांना लंकेंनी आपलेसे केले, तेच दोघे नेते खासदार विखे यांना वारंवार राजकीय आव्हान देत आलेले आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यातील विखेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. राम शिंदे हे विखे यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोल्हे, शिंदे व विखे एकाच पक्षाचे असले तरी कोल्हे, शिंदेंची भूमिका विखेविरोधी असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. आमदार नीलेश लंके लोकसभेसाठी विखेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतात, असे आडाखे बांधले जातात. त्याच लंकेंना कोल्हे आणि शिंदे पाठबळ देत असल्याने आ. नीलेश लंके यांच्या मतपेरणीला खतपाणी मिळते आहे.
दिवाळी फराळाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लंके यांनी मतांचे पीक तजेलदार होण्याच्या दृष्टीनेच भाजपचे आ. शिंदे आणि कोल्हे यांना खास निमंत्रित केले. कोल्हे, शिंदे यांना व्यासपीठावर बोलावून द्यायचा तो संदेश दिला. त्याहीपुढे भाजपच्या या दोघा नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत सूचक इशारेही दिले. ‘अहंकारी विचारांचे लोकांना खाली बसविण्यासाठी आ. लंके यांना ‘देव’ करत त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे’ अशी विवेकी साद कोल्हेंनी घातली. आमदार लंके यांचा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वाढता वावर आणि केली जाणारी पायाभरणी ही विखे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
विखे यावर जाहीरपणे बोलत नसले, तरी त्यांनीही आपली राजकीय पटबांधणी सुरू केली आहे. आमदार लंके यांची साथसंगत सोडलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना बळ देत आ. लंकेंच्या राजकीय वाटेत ‘स्पीडब्रेकर’ उभारण्याचा प्रयत्न विखेंकडून चालविला जात आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही विजय औटींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत त्यात हवा भरली. विखे-रोहित पवार यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होते. त्याच दोघांकडून लंके यांच्या कोंडीचा प्रयत्न हादेखील आगामी राजकीय ‘अटी-शर्तीं’चा भाग असू शकतो, असे आडाखे आतापासूनच बांधले जात आहेत.
पेल्यातील वादळानंतरही खदखद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासम्खास म्हणून आमदार राम शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. विखे-शिंदे यांच्यातील वाद म्हणजे ‘पेल्यातील वादळ’ असा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यावर पडदा टाकला, मात्र त्यानंतरही शिंदे वारंवार ‘काय अर्थ काढायचा, ज्याने त्याने समजून घ्यावे’ असे सूचक वक्तव्य करतच आहेत. विवेक कोल्हे यांनी आ. लंकेंच्या व्यासपीठावर ज्या पद्धतीने भाषण ठोकले, ते पाहता त्यांचाही बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आहे. गणेश साखर कारखान्याची सत्ता हस्तगत करताच विवेक कोल्हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले होते. तेच कोल्हे भाजपचे ज्येष्ठ नेते विखेंच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. एकूणच भाजप अंतर्गत आलबेल नसल्याचीच ही लक्षणे दिसतात.
सोशल व्हायरलचे परफेक्ट टायमिंग
आ. नीलेश लंके समर्थकांकडून एक सर्व्हे मतदारसंघांमध्ये फिरवला जात आहे. मतदारांची असलेली बदलाची भूमिका आणि विखे-शिंदे वाद भाजपला परवडणारा नाही, असे सांगणारा हा सर्व्हे लंके यांच्याकडून ‘परफेक्ट टायमिंग’ साधत सोशल व्हायरल केला जात आहे. त्यात लोकसभेला भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून राम शिंदे, सुवेंद्र दिलीप गांधी यांच्यासोबतच माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांची नावे या सर्व्हेत चर्चेत आणली आहेत. आमदार लंके यांची ही खेळी खा. विखे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. राष्ट्रवादी फुटीनंतर आ. लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तरी त्यांच्या होर्डिंग्जवरून अजूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो हटलेले नाहीत. आजही दोन्ही पवार सोबत असल्याचे दाखवून देण्याचा लंके यांचा प्रयत्न, हा ठरवून केलेला ‘डाव’ की मुत्सद्दीपणा, हे येणारा काळच सांगेल!
The post Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी appeared first on पुढारी.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्यात ‘राम’ नाही, या अर्थाने विरोधक आजपर्यंत त्यांच्याकडे पाहत आले. मात्र गेल्या वर्षात लोकसभेच्या दृष्टीने केलेली मोर्चेबांधणी, सोबतच भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि भाजपचे युवा नेते संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पाठबळामुळे आमदार लंके यांच्यात आता खर्‍या अर्थाने राजकीय ‘राम’ आल्याचे दिसते आहे. …

The post Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी appeared first on पुढारी.

Go to Source