सहा वर्षानंतर ‘संगीत देवबाभळी’ विसावणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ डिसेंबर २०१७ या दिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ ( Sangeet Devbabhali ) या नाटकाचा प्रारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री. षण्मुखानंद … The post सहा वर्षानंतर ‘संगीत देवबाभळी’ विसावणार appeared first on पुढारी.
सहा वर्षानंतर ‘संगीत देवबाभळी’ विसावणार


पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ डिसेंबर २०१७ या दिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ ( Sangeet Devbabhali ) या नाटकाचा प्रारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री. षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
संबंधित बातम्या 

जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शोमध्ये ‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान
रणबीर कपूर- सलोनी बत्राचे ‘Animal’ मधील कमाल BTS
मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण

हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु, भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. कोरोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही चाहत्यांचे प्रेम कमी झालं नाही. याच प्रेमामुळे ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो चाहत्यांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

खरं तर चाहत्यांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत. महाराष्ट्रात ( Sangeet Devbabhali ) नाटकाचा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री. षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे.
अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व चाहत्यांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे.
The post सहा वर्षानंतर ‘संगीत देवबाभळी’ विसावणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ डिसेंबर २०१७ या दिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ ( Sangeet Devbabhali ) या नाटकाचा प्रारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री. षण्मुखानंद …

The post सहा वर्षानंतर ‘संगीत देवबाभळी’ विसावणार appeared first on पुढारी.

Go to Source