तब्बल 285 वर्षांपूर्वीचा लिंबू!

लंडन : साध्याच वाटणार्‍या वस्तूंना कालौघात मोठी किंमत मिळू शकते. ते पाहून ‘कालाय तस्मै नमः’ म्हणून हात जोडण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही. आता अशाच एका छोट्याशा लिंबूला मोठी किंमत मिळाली आहे. याचे कारण म्हणजे हा लिंबू तब्बल 285 वर्षांपूर्वीचा आहे. इंग्लंडमध्ये एका आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचं कपाट उघडण्यात आलं. यामध्ये त्यांनी ठेवलेली ही किमती वस्तू … The post तब्बल 285 वर्षांपूर्वीचा लिंबू! appeared first on पुढारी.

तब्बल 285 वर्षांपूर्वीचा लिंबू!

लंडन : साध्याच वाटणार्‍या वस्तूंना कालौघात मोठी किंमत मिळू शकते. ते पाहून ‘कालाय तस्मै नमः’ म्हणून हात जोडण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही. आता अशाच एका छोट्याशा लिंबूला मोठी किंमत मिळाली आहे. याचे कारण म्हणजे हा लिंबू तब्बल 285 वर्षांपूर्वीचा आहे.
इंग्लंडमध्ये एका आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचं कपाट उघडण्यात आलं. यामध्ये त्यांनी ठेवलेली ही किमती वस्तू हाती लागली आहे. या निरुपयोगी दिसणार्‍या वस्तूची किंमत लाखोंच्या घरात आहे. इंग्लंडमध्ये झालेला लिलाव हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलेले हे लिंबू तब्बल 285 वर्षे जुने आहे. साधारण 2 इंचाचा हा लिंबू घरच्या साफसफाई दरम्यान कपाटात सापडला.
इंग्लडच्या श्रॉपशायरमध्ये ब्रेटेल्समध्ये एका घराचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी एका व्यक्तीला त्याच्या काकांच्या घरातील छोट्याशा कपाटात हे लिंबू सापडले. ते 19 व्या शतकातील असल्याचे त्याला समजले. हे लिंबू मौल्यवान असू शकते, असे त्याला वाटले. त्यामुळे घरासोबत लिंबूदेखील लिलावाला ठेवले. एखाद्याचे वर्षभराचे घरभाडे येईल इतकी या छोट्याशा दिसणार्‍या लिंबूची किंमत आहे. या लिंबूला 4 हजार 200 ते 6 हजार 300 रुपयांपर्यंत किंमत मिळेल, असे डेव्हिड ब्रेटेल नावाच्या या माणसाला वाटत होते; पण याचा लिलाव 1 हजार 400 पाऊंड म्हणजेच 1 लाख 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचला. तसेच ते छोटे वाटणारे कपाट 32 पाऊंड म्हणजेच साधारण 3 हजार 360 रुपयांना विकले गेले.
Latest Marathi News तब्बल 285 वर्षांपूर्वीचा लिंबू! Brought to You By : Bharat Live News Media.