आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता

कंपनी या व्यवसायात 40 टक्के हिस्सेदारी ठेवणार : भागधारकांनी दिला हिरवा कंदील वृत्तसंस्था/ मुंबई आयटीसी लिमिटेडच्या भागधारकांनी समूहाच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता दिली आहे. सिगारेटपासून साबणापर्यंत सर्व काही बनवणारी एफएमसीजी कंपनी आयटीसीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. आयटीसीने सांगितले की सुमारे 99.6 टक्के भागधारकांनी विलगीकरणाच्या बाजूने मतदान केले आहे. तर केवळ 0.4 टक्के जणांनी […]

आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता

कंपनी या व्यवसायात 40 टक्के हिस्सेदारी ठेवणार : भागधारकांनी दिला हिरवा कंदील
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटीसी लिमिटेडच्या भागधारकांनी समूहाच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता दिली आहे. सिगारेटपासून साबणापर्यंत सर्व काही बनवणारी एफएमसीजी कंपनी आयटीसीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. आयटीसीने सांगितले की सुमारे 99.6 टक्के भागधारकांनी विलगीकरणाच्या बाजूने मतदान केले आहे. तर केवळ 0.4 टक्के जणांनी विरोधात मतदान केले. 99.6 टक्के सार्वजनिक संस्था आणि 98.4 टक्के सार्वजनिक बिगर संस्थांनी विलगीकरणाच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.
हॉटेल व्यवसायात 40 टक्के हिस्सा ठेवणार
विलगीकरणानंतर हॉटेल व्यवसायात आयटीसी 40 टक्के हिस्सा प्राप्त करणार आहे. उर्वरित 60 टक्के भागभांडवल भागधारकांकडे राहणार आहे. आयटीसीने गेल्या वर्षी जुलैमध्ये विलगीकरणाची योजना जाहीर केली आणि नंतर सांगितले की नवीन युनिट 15 महिन्यांत सूचीबद्ध केले जाईल.
आयटीसी हॉटेल्स एक स्वतंत्र युनिट म्हणून टाटाच्या मालकीची इंडियन हॉटेल्स कंपनी आणि इआयएच असोसिएटेड हॉटेल्स यांसारख्या स्पर्धकांशी स्पर्धा करेल. इंडियन हॉटेल्स ताज हॉटेल्स चालवतात. इआयएच हॉटेल्सच्या ओबेरॉय ब्रँडचे व्यवस्थापन करते. आयटीसीच्या आर्थिक वर्ष 2024 मधील महसुलात हॉटेल व्यवसायाने 4 टक्के योगदान दिले.
 तिमाहीचा नफा 5,120 कोटी
आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) आयटीसीचा नफा वार्षिक आधारावर 4 टक्के घसरून 5120.55 कोटी रुपये झाला. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 5,335.23 कोटी होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति शेअर 7.50 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.