दिल्लीतील आणखी एका रुग्णालयाला आग
अफरा-तफरीचे होते वातावरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या लाजपत नगर भागातील एका रुग्णालयात बुधवारी आग लागण्याची घटना घडली आहे. आग लागल्याचे समोर येताच पूर्ण परिसरात अफरा-तफरीची स्थिती निर्माण झाली. आगीसंबंधी अग्निशमन दलाला त्वरित कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले.
लाजपत नगरमधील आय7 रुग्णालयात ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 16 वाहनांनी तेथे धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. आग कशामुळे लागली याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. तर आग लागल्यावर तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अग्निशमन दलाच्या कार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या दुर्घटनेत अद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही.
Home महत्वाची बातमी दिल्लीतील आणखी एका रुग्णालयाला आग
दिल्लीतील आणखी एका रुग्णालयाला आग
अफरा-तफरीचे होते वातावरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीच्या लाजपत नगर भागातील एका रुग्णालयात बुधवारी आग लागण्याची घटना घडली आहे. आग लागल्याचे समोर येताच पूर्ण परिसरात अफरा-तफरीची स्थिती निर्माण झाली. आगीसंबंधी अग्निशमन दलाला त्वरित कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. लाजपत नगरमधील आय7 रुग्णालयात ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या […]