सिद्धारुढ महाराज स्वामींचा वार्षिकोत्सव भक्तिभावाने
विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी सोहळा उत्साहात
बेळगाव : लक्ष्मी टेकडी, सैनिकनगर येथे असणाऱ्या तेज प्रतिबिंब पीठाच्या श्री रुद्रकेसरी मठ सेवा समिती येथे श्री जगद्गुरु सिद्धारुढ महाराज स्वामींचा बारावा वार्षिक उत्सव व धर्मसभा असा कार्यक्रम रविवार दि. 3 व सोमवार दि. 4 मार्च रोजी भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी 6 वा. अखंड वीणासेवा सुरू झाली. सकाळी 8 ते 9 या वेळेत श्री जगद्गुरु सिद्धारुढ स्वामींच्या मूर्तीचा रुद्राभिषेक झाला. याप्रसंगी रुद्रकेसरी मठ सेवा समितीचे प्रमुख प. पू. हरिगुरु महाराज उपस्थित होते. अभिषेकाचे यजमानपद कुशकुमार देसाई यांनी सपत्नीक स्वीकारले. सायंकाळी 4 ते 8 या वेळेत जगद्गुरु सिद्धारुढ महाराजांचा पालखी सोहळा पार पडला. मठापासून संपूर्ण सैनिकनगरमध्ये पालखी नेण्यात आली व मठामध्ये सांगता झाली. पालखीपूजन मुंबईचे तन्मय संजय मयेकर यांनी केले. रात्री 8.30 ते 9 महामंगलारती झाली. सोमवार दि. 4 रोजी सकाळी श्री गणेशमूर्तीवर अभिषेक करण्यात आला. याचे यजमानपद अभिषेक कदम यांनी सपत्नीक स्वीकारले. स्वामींच्या मूर्तीवर रुद्राभिषेक करण्यात आला. त्याचे यजमानपद विनायक जाधव व सागर देसाई यांनी सपत्नीक केले. किरण चिंगळी यांनी सपत्नीक शिवलिंगाभिषेक विधी पूर्ण केला.
याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, कर्नाटक सरकारचे दिल्लीचे माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे मदनकुमार भैरप्पन्नवर, विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी पाटील, श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुसकर, शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे, लेक व्ह्यू हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिरीश सोनवाळकर, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आदी उपस्थित होते. सकाळी 9.30 वा. महामंगळारती झाल्यानंतर 11 ते 1 सनातन धर्मसभा अंतर्गत परमपूज्य हरिगुरु महाराज यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुत्नाळ-बडेसूर येथील केदार मठाचे प. पू. शिवाचार्य महास्वामी, काडसिद्धेश्वर मठाचे प. पू. कृपानंद स्वामी, गोकाक येथील धर्मदर्शिनी ज्ञानमंदिरच्या मातोश्री सुवर्णाआई होसमठ आदी उपस्थित होते. स्वामींच्या हस्ते सैनिकनगरमधील दहावी व बारावी परीक्षेतील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कुशकुमार देसाई यांनी केले. दीपक अग्रवाल यांनी आभार मानले. सोहळ्यानिमित्त सकाळी 8 ते 12 मण्णीकेरी येथील श्री ब्रह्मलिंगेश्वर मंडळ, 2.30 ते 6 गळतगा येथील राजा पंढरी भजनी मंडळ व 6 ते 7 श्री आदिशक्ती मुक्ताई महिला मंडळ यांचे भजन झाले. सोमवारी दुपारी 1 वा. महाप्रसादाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे रात्री 12 पर्यंत महाप्रसाद सुरू होता. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Home महत्वाची बातमी सिद्धारुढ महाराज स्वामींचा वार्षिकोत्सव भक्तिभावाने
सिद्धारुढ महाराज स्वामींचा वार्षिकोत्सव भक्तिभावाने
विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी सोहळा उत्साहात बेळगाव : लक्ष्मी टेकडी, सैनिकनगर येथे असणाऱ्या तेज प्रतिबिंब पीठाच्या श्री रुद्रकेसरी मठ सेवा समिती येथे श्री जगद्गुरु सिद्धारुढ महाराज स्वामींचा बारावा वार्षिक उत्सव व धर्मसभा असा कार्यक्रम रविवार दि. 3 व सोमवार दि. 4 मार्च रोजी भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी 6 वा. अखंड वीणासेवा सुरू […]