सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने घरे मंजूर करा
महानगरपालिकेमध्ये बैठक : सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक अडचणी
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये 253 सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने घरे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर मैलावाहू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्रांचेही वाटप करावे, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेचे दीपक वाघेला, विजय निरगट्टी यांनी केली आहे. महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वरील मागणी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. तेव्हा तातडीने सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, साहाय्यक अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना घरे द्यावीत. त्याचबरोबर त्यांना तातडीने हक्कपत्रे देखील द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला सफाई कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने घरे मंजूर करा
सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने घरे मंजूर करा
महानगरपालिकेमध्ये बैठक : सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक अडचणी बेळगाव : महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये 253 सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने घरे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर मैलावाहू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्रांचेही वाटप करावे, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेचे दीपक वाघेला, विजय निरगट्टी यांनी केली आहे. महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. […]
