स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा आरोप
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव (पीए) बिभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना फोन केल्याचं सांगण्यात आले आहे.
पोलिसांचे पथक सीएम केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. सीएम निवासस्थानातून बाहेर पडल्यावर स्वाती पोलीस सटेशन मध्ये पोहोचल्या. या प्रकरणी भाजप ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला आणि फोन करणाऱ्याने मी स्वाती मालीवाल असल्याचे सांगितले. सीएम हाऊस मध्ये सदर व्यक्तीने तिला मारहाण केल्याची तक्रार केली. नंतर दुसऱ्यांदा फोन केल्यावर पीए बिभव याने मला मारहाण केल्याचे सांगितले. 2 पीसीआर कॉल करण्यात आले आहेत. पहिला कॉल 9:31 वाजता आणि दुसरा कॉल 9:39 वाजता करण्यात आला.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयातून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
भाजप कडून आपच्या महिला राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप करत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू लोकांपैकी एक ओळखले जाते. विशेष म्हणजे त्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
Edited by – Priya Dixit