ब्रिटनच्या ड्रेपरकडून अल्कारेझ पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत विद्यमान विम्बलडन विजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरकडून पराभव पत्करावा लागला. जॅक ड्रेपरने अल्कारेझचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुषांच्या एकेरीच्या सामन्यात ड्रेपरने अल्कारेझचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. अल्कारेझ या स्पर्धेतील माजी विजेता आहे. आता ड्रेपरला क्विन्स क्लब टेनिस स्पर्धा जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 2016 साली ब्रिटनच्या अँडी मरेने पाचव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यानंतर आजपर्यंत ब्रिटनच्या टेनिसपटूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
Home महत्वाची बातमी ब्रिटनच्या ड्रेपरकडून अल्कारेझ पराभूत
ब्रिटनच्या ड्रेपरकडून अल्कारेझ पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत विद्यमान विम्बलडन विजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरकडून पराभव पत्करावा लागला. जॅक ड्रेपरने अल्कारेझचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुषांच्या एकेरीच्या सामन्यात ड्रेपरने अल्कारेझचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. अल्कारेझ या स्पर्धेतील माजी […]