कर्मचारी भरती आयोगाकडून इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागांची जाहिरात
पणजी : गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) नोकरभरतीसाठी दुसरी जाहिरात सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असून शिक्षण खात्याकडून सरकारी प्राथमिक विद्यालयात इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागा भरण्यात येणार आहे. यूआर 22 तर एसटी 14 अशा मिळून 36 जागा शिक्षण खात्यातर्फे भरण्यात येणार आहेत. तसेच या 36 जागांपैकी 9 जागा दिव्यांग आणि 7 जागा माजी सैनिकांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षक नोकरभरतीसाठी बी. एड पदवीधारक पात्र असून, वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाने सरकारी नोकरभरतीची पहिली जाहिरात 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली होती. नवीन वर्षात ही दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जानेवारी अखेरीस आणखी काही पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गेल्या 29 डिसेंबर रोजी आयोगाने ज्या 33 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात वाहतूक खात्यात नेटवर्क अभियंता, पोलीस लॅब टेक्निशियन, साहाय्यक उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर), उच्च शिक्षण टेक्निशियन, ग्रंथपाल ग्रेड 1, ग्रंथपाल ग्रेड 2, माध्यमिक स्तरावर चित्रकला शिक्षक, वस्तूसंग्रहालय साहाय्यक आणि बंदर कप्तान लायट हाऊस कीपर आदी पदांचा समावेश आहे.
‘त्या’ 33 पदांसाठी हजारपेक्षा जादा अर्ज
राज्य कर्मचारी निवड आयोगाने विविध सरकारी खात्यांमध्ये 33 पदे भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या जाहिरातीस तऊणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गत 15 दिवसात एक हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा असून आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप 10 दिवस शिल्लक असल्याने अर्जांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Home महत्वाची बातमी कर्मचारी भरती आयोगाकडून इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागांची जाहिरात
कर्मचारी भरती आयोगाकडून इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागांची जाहिरात
पणजी : गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) नोकरभरतीसाठी दुसरी जाहिरात सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असून शिक्षण खात्याकडून सरकारी प्राथमिक विद्यालयात इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागा भरण्यात येणार आहे. यूआर 22 तर एसटी 14 अशा मिळून 36 जागा शिक्षण खात्यातर्फे भरण्यात येणार आहेत. तसेच या 36 जागांपैकी 9 जागा दिव्यांग आणि 7 जागा माजी सैनिकांच्या […]