यात्रा-जत्रांमुळे बससेवेवर अतिरिक्त ताण
प्रवाशांच्या संख्येत वाढ : विद्यार्थ्यांचे मात्र हाल, बसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा
बेळगाव : यात्रा-जत्रांना प्रारंभ झाल्याने प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत बसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा वाजू लागले आहेत. आधीच शक्ती योजनेने डोकेदुखी वाढली आहे. त्यातच यात्रा-जत्रांमुळे प्रवासी भाविकांची संख्या वाढल्याने सार्वजनिक बससेवेवर परिणाम होत आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा काळात सुरळीत बस मिळणार का? असा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. त्यातच यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. मोहनगा-द•ाr, खानापूर तालुक्यातील काही गावच्या महालक्ष्मींना प्रारंभ झाला आहे. त्याबरोबर इतर लहान-सहान यात्राही होवू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. परिणामी बसफेऱ्या कमी होवू लागल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे यामध्ये हाल होवू लागले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावू लागल्या आहेत. मात्र यात्रा-जत्रांचा अतिरिक्त ताण बससेवेवर पडू लागला आहे. त्यामुळे परिवहनची बससेवा अनियमित होवू लागली आहे. यात्रा-जत्रांच्या स्थळी अतिरिक्त बससेवा पुरविली जात आहे. त्यामुळे इतर मार्गावरील बस फेऱ्या कमी होत आहेत. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांनीच प्रवास करावा लागत आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना बस मिळेनाशा झाल्या आहेत.
Home महत्वाची बातमी यात्रा-जत्रांमुळे बससेवेवर अतिरिक्त ताण
यात्रा-जत्रांमुळे बससेवेवर अतिरिक्त ताण
प्रवाशांच्या संख्येत वाढ : विद्यार्थ्यांचे मात्र हाल, बसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा बेळगाव : यात्रा-जत्रांना प्रारंभ झाल्याने प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत बसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा वाजू लागले आहेत. आधीच शक्ती योजनेने डोकेदुखी वाढली आहे. त्यातच यात्रा-जत्रांमुळे […]