लहान मुलांना दूध देतांना त्यामध्ये साखर ऐवजी या वस्तू घाला, आरोग्यासाठी फायदेशीर

वाढत्या मुलांसाठी कमीतकमी 400 ते 600 मिली दूध गरजेचे असते. मुलं जर दूध पीत नसतील तर या वस्तू मिसळा यामुळे मुलं दूध देखील आवडीने पितील व सोबत आरोग्य देखील चांगले राहील. मुलं एक वर्षाचे झाल्यानंतर दुधाची मात्रा कमी करावी. पण दूध शरीराच्या वाढीसाठी …

लहान मुलांना दूध देतांना त्यामध्ये साखर ऐवजी या वस्तू घाला, आरोग्यासाठी फायदेशीर

वाढत्या मुलांसाठी कमीतकमी 400 ते 600 मिली दूध गरजेचे असते. मुलं जर दूध पीत नसतील तर या वस्तू मिसळा यामुळे मुलं दूध देखील आवडीने पितील व सोबत आरोग्य देखील चांगले राहील. 

 

मुलं एक वर्षाचे झाल्यानंतर दुधाची मात्रा कमी करावी. पण दूध शरीराच्या वाढीसाठी महत्वपूर्ण असते. काही मुलं दूध प्यायला नाही म्हणतात. म्हणून अंक वेळेस माता मुलांना दुधामध्ये साखर मिक्स करून देतात. अशावेळेस साखर मिक्स न करता या वस्तू मिक्स कराव्या. तर चला जाणून घेऊ या कोणत्या आहे त्या वस्तू . 

 

मध-

जर मुलांची रोगप्रतिकात्मक शक्ती कमी असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना गरम दुधामध्ये मध मिक्स करून द्यावे. 

 

नट्स-

जर मुलं नुसते दूध पीत नसतील तर त्यामध्ये काजू, बदाम ची पावडर मिक्स करावी. दूधामध्ये ही पावडर उकळावी व मुलांना द्यावी. 

 

ड्रायफ्रूट्स-

लहान मुलांना दुधामध्ये अंजीर, अक्रोड, मनुका हे उकळून प्यायला द्यावे. यामुळे दुधाचा गोडवा वाढेल आणि पोषक तत्व देखील शरीराला मिळतील. 

 

दलिया-

जर मुलं दूध पीत नसतील तर थोड्या प्रमाणात दलिया दुधामध्ये उकळून द्यावा. यामुळे मुलं आवडीने दूध पितील व आवश्यक पोषक तत्व देखील शरीरात जातील. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

 

Edited By- Dhanashri Naik