Accident: नेपाळ मध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली 14 जणांचा मृत्यू
मध्य नेपाळमधील मर्स्यांगडी नदीत एक भारतीय प्रवासी बस कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, बसमध्ये 40 प्रवासी होते. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहाडा येथे हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यावर 45 कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले बचावकार्य सुरु केले आहे. 14 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे.
गोरखपूरहून नेपाळला 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पोखराहून काठमांडू जाताना तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली.लष्कर आणि सशस्त्र दलांना माहिती देण्यात आली आहे. समध्ये एकूण 40 प्रवासी होते. 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ही बस भारताची असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited by – Priya Dixit