“कोलकातामध्ये जे घडले तेच तुमच्यासोबत…” रिक्षाचालकाची मुलींना धमकी

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोलकाता प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना उजागर होत आहेत. नागपूरमधून देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांसोबत जे घडले तेच तुमच्यासोबत करू अशी धमकी एका रिक्षा चालकाने दिल्याचा आरोप दोन शाळकरी मुलींनी केला आहे. रिक्षा चालकाने धमकी दिल्यानंतर रिक्षा थांबवण्याची मागणी देखील केली.  रिपोर्ट्सनुसार, मुली आणि ड्रायव्हरमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने जोरात बोलू नका असे मुलींना सांगितले. तसेच मुलींनी केलेल्या आरोपानुसार, “कोलकाता येथील मुलीसोबत जे घडले तेच मी तुमच्यासोबत करीन,” असे म्हटले. विद्यार्थ्यांनी तात्काळ चालकाकडे ऑटो थांबवण्याची मागणी केली. त्याने असे केल्यावर मुलींनी त्याला बाहेर काढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हाणामारी पाहून वाटसरूही त्यात सामील झाले आणि ड्रायव्हर काय बोलले हे समजल्यानंतर त्यांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. नागपुरातील पार्डी पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी दुपारी घडलेली ही घटना शुक्रवारी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आली. वृत्तानुसार, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून ऑटो चालकावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.हेही वाचा धक्कादायक! मित्राकडूनच मित्राची हत्यापालिकेच्या 5 पे-अँड-पार्कवर माफियांचा ताबा
“कोलकातामध्ये जे घडले तेच तुमच्यासोबत…” रिक्षाचालकाची मुलींना धमकी


गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोलकाता प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना उजागर होत आहेत. नागपूरमधून देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांसोबत जे घडले तेच तुमच्यासोबत करू अशी धमकी एका रिक्षा चालकाने दिल्याचा आरोप दोन शाळकरी मुलींनी केला आहे. रिक्षा चालकाने धमकी दिल्यानंतर रिक्षा थांबवण्याची मागणी देखील केली. रिपोर्ट्सनुसार, मुली आणि ड्रायव्हरमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने जोरात बोलू नका असे मुलींना सांगितले. तसेच मुलींनी केलेल्या आरोपानुसार, “कोलकाता येथील मुलीसोबत जे घडले तेच मी तुमच्यासोबत करीन,” असे म्हटले. विद्यार्थ्यांनी तात्काळ चालकाकडे ऑटो थांबवण्याची मागणी केली. त्याने असे केल्यावर मुलींनी त्याला बाहेर काढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हाणामारी पाहून वाटसरूही त्यात सामील झाले आणि ड्रायव्हर काय बोलले हे समजल्यानंतर त्यांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.नागपुरातील पार्डी पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी दुपारी घडलेली ही घटना शुक्रवारी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आली.वृत्तानुसार, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून ऑटो चालकावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.हेही वाचाधक्कादायक! मित्राकडूनच मित्राची हत्या
पालिकेच्या 5 पे-अँड-पार्कवर माफियांचा ताबा

Go to Source