आरतीची हत्या, सरफराजला फासावर लटकविण्याची मगणी
आसाममध्ये संतापाचे वातावरण : रस्त्यांवर उग्र निदर्शने
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
5 मार्च घरातून कामासाठी बाहेर पडलेली 16 वर्षी आरती घरी परतली नव्हती. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरती कुमारी दासचा मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत त्यानंतर सापडला होता. आरतीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. आरतीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी एका युवकावर मुलीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार करण्याचा आणि तिची हत्या करण्याचा आरोप केला. याप्रकरणामुळे आसाममधील बोंगाईगाव आता अशांत झाले असून या प्रकरणाने सांप्रदायिक वळण घेतले आहे. लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत असून पोलिसांनी आरोपी युवकाचा शोध सुरू केला आहे.
बोंगाईगावच्या महावीरस्तान येथे ही घटना घडली आहे. संशयित आरोपीचे नाव सरफराज हुसैन आहे. सरफराजने आरतीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. आरतीचा मृतदेह मिळाल्यावर बोंगाईगावचे लोक भडकले आहेत. जमावाने आरतीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून निदर्शने केली. या जमावाने सरफराजला फासावर लटकविण्याची मागणी लावून धरली आहे. आसाममध्ये आता आरती हत्या प्रकरण तापू लागले आहे.
Home महत्वाची बातमी आरतीची हत्या, सरफराजला फासावर लटकविण्याची मगणी
आरतीची हत्या, सरफराजला फासावर लटकविण्याची मगणी
आसाममध्ये संतापाचे वातावरण : रस्त्यांवर उग्र निदर्शने वृत्तसंस्था/ गुवाहाटी 5 मार्च घरातून कामासाठी बाहेर पडलेली 16 वर्षी आरती घरी परतली नव्हती. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरती कुमारी दासचा मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत त्यानंतर सापडला होता. आरतीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. आरतीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी एका युवकावर मुलीचे अपहरण करत […]
