अतिवृष्टीचा घेतला आढावा
समन्वयाने काम करण्यासह 24 तास साहाय्यवाणी सुरू करा
बेळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती व संभाव्य पूर हाताळण्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. शुक्रवारी जि. पं. च्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ही सूचना केली. अतिवृष्टी व संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी तहसीलदारांनी कार्यक्षेत्रातील आमदारांशी सतत संपर्कात रहावे. आमदारांच्या उपस्थित बैठकही घ्यावी. महानगरपालिका व तालुका केद्रांमध्ये साहाय्यवाणी सुरू करावी. 24 तास नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. काळजी केंद्रांमध्ये आश्रय घेणाऱ्यांसाठी उत्तम दर्जाचे जेवण उपलब्ध करून द्यावे, संसर्गजन्य रोगराईचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आवश्यक औषध साठा करून ठेवावे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे सर्व्हेक्षण करताना कोणत्याही प्रकारच्या चुका व कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेत सर्वेक्षण करण्याची सूचना केली.
धरणातील पाणीसाठा व विसर्गावर लक्ष ठेवावे. एखाद्या पुलावर पाणी आल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन म्हणाले, संततधार पावसामुळे हिडकल डॅम 90 टक्के भरला आहे. नविलतीर्थ 67.46 टक्के भरला. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात 4.27 काळजी केंद्रे स्थापन करण्यासाठी स्थळ निश्चिती केली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत पावसामुळे पाचजण दगावले आहेत. जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बाळंतिणींना घरपोच रेशन देण्यात येत असल्याचे सांगितले. आतापर्यंत 6500 हून अधिक बाळंतिणींच्या घरी रेशन पोहोचविण्यात आले. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या जनावरांवर उपचार सुरू आहेत. बैठकीत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी दिनेशकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अतिवृष्टीचा घेतला आढावा
अतिवृष्टीचा घेतला आढावा
समन्वयाने काम करण्यासह 24 तास साहाय्यवाणी सुरू करा बेळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती व संभाव्य पूर हाताळण्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. शुक्रवारी जि. पं. च्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ही सूचना केली. अतिवृष्टी व संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी तहसीलदारांनी कार्यक्षेत्रातील आमदारांशी सतत संपर्कात रहावे. आमदारांच्या […]