रिंगरोडविरोधात पुन्हा जनआंदोलन उभारणार

तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंगरोड करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा तालुका म. ए. समितीच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. रिंगरोडविरोधात पुन्हा जनआंदोलन करण्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. कॉलेज रोड येथील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीमध्ये रिंगरोडबाबत […]

रिंगरोडविरोधात पुन्हा जनआंदोलन उभारणार

तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंगरोड करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा तालुका म. ए. समितीच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. रिंगरोडविरोधात पुन्हा जनआंदोलन करण्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. कॉलेज रोड येथील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीमध्ये रिंगरोडबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच फलोत्पादन खात्याचे अधिकारी रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे बार असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी सांगितले. यापुढेही भव्य जनआंदोलन उभे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच पुन्हा रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, अॅड. शाम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, बी. डी. मोहनगेकर यांच्यासह इतर म. ए. समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.