पर्वरीत मद्यपी पर्यटकाच्या जीपने ठोकरल्याने दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू

पर्वरी : पर्वरी येथे महामार्गावर डेल्फिनो सुपरमार्केटसमोर नशेत असलेल्या थार जीप चालकाने स्कुटरला जोरदार धडक दिल्याने दिव्यांग व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर नवीन वर्षाच्या सुऊवातीला अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर कसे नियंत्रण ठेवावे, असा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. पर्वरीचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल मंगळवारी दि. 16 पहाटे पाच वाजता पणजीला जाणाऱ्या थार […]

पर्वरीत मद्यपी पर्यटकाच्या जीपने ठोकरल्याने दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू

पर्वरी : पर्वरी येथे महामार्गावर डेल्फिनो सुपरमार्केटसमोर नशेत असलेल्या थार जीप चालकाने स्कुटरला जोरदार धडक दिल्याने दिव्यांग व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर नवीन वर्षाच्या सुऊवातीला अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर कसे नियंत्रण ठेवावे, असा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. पर्वरीचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल मंगळवारी दि. 16 पहाटे पाच वाजता पणजीला जाणाऱ्या थार जीपने (क्र. जीए-03,झेड-6188) डेल्फिनो सुपरमार्केटसमोर स्कुटरला (क्र. जीए-03,एसी-8829) मागून जोरदार धडक दिली. अपघातात दिव्यांग कित्तू बेहरा (51, म्हापसा) जागीच ठार झाला. जीपचालक नरेश जैन (41, वसई-महाराष्ट्र) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठविले असता त्याने मद्यपान केले असल्याचे आढळले. सहायक उपनिरीक्षक संजीव साळुंके यांनी अपघाताचा पंचनामा केला. निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.