हिंदवाडी येथे नारळाचे झाड विद्युतवाहिन्यांवर कोसळले

तीन विद्युतखांबांचे नुकसान बेळगाव : नारळाचे झाड कोसळून विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी हिंदवाडी येथे घडली. यामुळे काहीकाळ परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा रस्ता काहीकाळ बंदही ठेवावा लागला. यामध्ये तीन विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. कोसळलेले झाड दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आदर्शनगर, वडगाव येथून गोमटेश विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी नारळाचे झाड कोसळले. […]

हिंदवाडी येथे नारळाचे झाड विद्युतवाहिन्यांवर कोसळले

तीन विद्युतखांबांचे नुकसान
बेळगाव : नारळाचे झाड कोसळून विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी हिंदवाडी येथे घडली. यामुळे काहीकाळ परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा रस्ता काहीकाळ बंदही ठेवावा लागला. यामध्ये तीन विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. कोसळलेले झाड दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आदर्शनगर, वडगाव येथून गोमटेश विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी नारळाचे झाड कोसळले. सोमवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा सुरू असल्याने झाड कोसळल्याची शक्यता आहे. रस्त्यावरच झाड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. केएलएस आयएमईआर कॉलेजच्या मागील बाजूला असलेल्या विद्युतवाहिन्यांवर हे झाड कोसळले. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीजपुरवठा बंद केला. हेस्कॉमचे दुरुस्ती वाहन घटनास्थळी पोहोचून विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. झाड बाजूला करून रस्ता मोकळा करून देण्यात आला. झाड कोसळल्यामुळे  ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने शाळेत पोहोचावे लागले.