गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट आणि चविष्ट केळी बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी लिहून घ्या…..

साहित्य-
बेसन: १ वाटी
पिकलेली केळी: २ (मॅश केलेली)
साजूक तूप: ½ वाटी
दूध किंवा पाणी: १ ते १.५ वाटी (गरम)
साखर: ¾ वाटी (आवडीनुसार)
वेलची-जायफळ पूड: १ चमचा
ड्रायफ्रूट्स: काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे
केशर: ५-६ काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)

ALSO READ: चविष्ट अंजीर मोदक गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
कृती-
बेसन भाजणे: कढईत साजूक तूप गरम करा. त्यात बेसन घालून मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि सुवास सुटेपर्यंत सतत हलवत भाजा.
केळी घालणे: बेसन व्यवस्थित भाजले की त्यात मॅश केलेली केळी घाला. २ मिनिटे मंद आचेवर बेसनासोबत केळी छान परतून घ्या.
दूध/पाणी घालणे: आता त्यात गरम दूध (किंवा गरम पाणी) आणि केशर घातलेले दूध हळूहळू घाला. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत सतत ढवळत राहा.
वाफ काढणे: मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडायला लागले की झाकण ठेवून २ मिनिटे मंद आचेवर वाफ काढून घ्या.
साखर आणि मसाले: झाकण काढून त्यात साखर, वेलची-जायफळ पूड आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे घाला. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत आणि हलव्याला छान तूप सुटेपर्यंत २-३ मिनिटे परता.
नैवेद्य तयार: तयार झालेला गरमागरम केळी बेसन हलवा एका प्लेटमध्ये काढून वरून ड्रायफ्रूट्स आणि तुळशीचे पान ठेवून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

ALSO READ: स्वादिष्ट आणि पारंपारिक काजू मोदक; गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी
Edited By- Dhanashri Naik