घरफाळा दंडात 50 टक्के सवलत

महापालिकेचा निर्णय : 15 मार्चपर्यंत सवलत योजना : सुट्टी दिवशीही नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू कोल्हापूर प्रतिनिधी महापालिकेने घरफाळा दंडामध्ये सवलत योजना आणली आहे. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्यांच्या दंडामध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. यानंतर 16 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्यांच्या दंडात 30 टक्के सवलत असल्याची माहिती कर […]

घरफाळा दंडात 50 टक्के सवलत

महापालिकेचा निर्णय : 15 मार्चपर्यंत सवलत योजना : सुट्टी दिवशीही नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेने घरफाळा दंडामध्ये सवलत योजना आणली आहे. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्यांच्या दंडामध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. यानंतर 16 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्यांच्या दंडात 30 टक्के सवलत असल्याची माहिती कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे.
सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकास घरफाळ्याची सर्व रक्कम यावेळी भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे थकीत घरफाळ्यासाठी ज्यांची मिळकती सील केल्या असतील त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. 15 मार्चपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहे. तसेच मनपाच्या वेबसाईटसह ऑनलाईनने पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महिन्याला 2 टक्के दंड सुरु

1 डिसेंबरपासून प्रति महिने 2 टक्के प्रमाणे दंड व्याज आकारणी सुरू आहे. हा दंड बसू नये तसेच सध्याची थकबाकीत सवलत घ्यायची मनपाच्या सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी केले आहे.